Nanded Crime  Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : नांदेडमध्ये दुहेरी हत्याकांड! एकाच घरातील दोन सुनांची हत्या, नेमकं काय प्रकरण?

Nanded Crime News : नांदेडमध्ये शेतात काम करत असताना दोन जावांची गळा दाबून हत्या झाली आहे. ही हत्या लुटमारीतून झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस तपास सुरू.

Alisha Khedekar

  • दोन सख्ख्या जावांची शेतात निर्घृण हत्या

  • हत्या लुटमारीतून झाल्याची शक्यता व्यक्त

  • मृत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र गायब

  • पोलिस तपास सुरू

संजय सूर्यवंशी, नांदेड

नांदेडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील एका शेतात दोन सख्ख्या जावांचा गळा दाबून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. लुटमारीतून ही घटना घडली असल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. मृत महिलांची नावे अंतकलाबाई अशोक आढागळे (६० वर्ष) आणि अनुसयाबाई साहेबराव आढागळे (४५ वर्ष ) अशी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार अंतकलाबाई अशोक आढागळे आणि अनुसयाबाई साहेबराव आढागळे या एकाच घरातील सख्ख्या जावा शेतात कापूस वेचणीसाठी शेतात कामाला गेल्या होत्या. यादरम्यान शेतात कापूस वेचत असताना या दोघींची गळा दाबून निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येत दोघींचाही जागीच मृत्यू झाला.

दोघींचाही मृतदेह शेतात पडलेला आढळल्याने गावात खळबळ उडाली. गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना याप्रकरणी माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून ही हत्या लुटमारीतून केली असल्याचा प्राथमिक तपासात म्हटलं आहे.

हत्येचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसले तरी दोन्ही महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र गायब असल्याचं पोलीस म्हणाले. पोलीस या हत्येमागच्या आरोपीचा तपास घेत असून दिवसाढवळ्या झालेल्या दुहेरी हत्याकांडातून गावात खळबळ उडाली आहे. तसेच एकाच दिवशी घरातील दोन्ही सुनांचा मृत्यू झाल्याने आढागळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashes 2025-26: W,W,W,W,W,W,W... स्टार्कच्या वादळात इंग्लंडची दाणादाण, फक्त १७२ धावात उडाला खुर्दा

Maharashtra Live News Update : मावळात दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित

Samsung India: गुड न्यूज! सॅमसंग गॅलेक्सी टॅब A11+ भारतात लॉन्चसाठी तयार; जाणून घ्या तारीख

Accident : ताम्हिणी घाटात भयंकर घडलं! ६ जिवलग मित्रांचा मृत्यू, 'त्या' हॉटेलचालकामुळे उलगडला अपघाताचा थरार

Kitchen Hacks : कांदा चिरताना तुमचे डोळे पाणावतात ? मग फॉलो करा या सिक्रेट टिप्स

SCROLL FOR NEXT