Palghar Crime News Saam TV
महाराष्ट्र

Palghar Crime : कारवाई टाळण्यासाठी मागितली २ लाखांची लाच; महावितरणचे दोन वरिष्ठ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

आजकाल पैशांसाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. चांगली नोकरी असून सुद्धा काहीजण पैशांसाठी आपला स्वाभिमान विकून टाकतात.

रुपेश पाटील

पालघर : आजकाल पैशांसाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. चांगली नोकरी असून सुद्धा काहीजण पैशांसाठी आपला स्वाभिमान विकून टाकतात. अशीच एक घटना पालघर (Palghar) जिल्ह्यातून समोर आली आहे. पालघरमध्ये वीज वितरण विभागाच्या दोन वरिष्ठ कर्मचाऱ्यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. (Latest Marathi News)

अधीक्षक अभियंता किरण नागवकर आणि कार्यकारी अभियंता प्रताप मचीए, अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, या दोनही अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे दोन लाख रुपयांची मागणी (Crime News) केली होती. या दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात आलं असून त्यांची रवानगी तुरूंगात करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात लाचखोरींच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. लाचखोर अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने फास आवळला आहे. एकीकडे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचा कारवाईचा धडाका सुरू असताना, पालघरच्या या दोन अधिकाऱ्यांनी कुणालाही न जुमानता दोन लाख रुपयांची लाच मागितली.

मात्र, तक्रारदार व्यक्तीची लाच देण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक पथकाला दिली. तक्रार प्राप्त होताच, लाचलुचपत पथकाने सापळा रचला. ठरलेल्या वेळात तक्रारदार १ लाख रुपये घेऊन या दोनही अधिकाऱ्यांकडे गेला. यावेळी दोघांनाही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना आणखी धक्के बसणार? 6 नगरसेवक सोडणार ठाकरेंची साथ, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

जमिनीसाठी आई-बापाच्या जीवावर उठले, निर्लज्ज मुलांची आई-वडिलांना भररस्त्यात मारहाण

Pomegranate Vs Dragon Fruit : डाळिंब vs ड्रॅगन फ्रूट ? कोणतं फळ खाल्ल्याने मिळतं जास्त पोषण

मनोज जरांगे पाणी प्यायले, पण उपोषणावर ठाम; नेमकी चर्चा काय अन् निर्णय काय झाला?

जरांगेंची तब्येत बिघडली, आंदोलन चिघळणार? राज्यभरात जरांगेंचे समर्थक रस्त्यावर

SCROLL FOR NEXT