Dada Bhuse : मंत्री दादा भुसेंची तरुणांना पोलिसांसमोर मारहाण; जितेंद्र आव्हाडांनी केला VIDEO ट्विट

मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.
Jitendra Awhad Tweet Dada Bhuse Video
Jitendra Awhad Tweet Dada Bhuse VideoSaam TV

Jitendra Awhad Tweet Dada Bhuse Video : राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटातील मंत्री कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत आहेत. एकीकडे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन वाटप घोटाळ्याचा आरोप केला जात असताना, आता दुसरीकडे शिंदे गटातील आणखी एक मंत्री चर्चेत आले आहेत. मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. (Latest Marathi News)

Jitendra Awhad Tweet Dada Bhuse Video
Winter Session 2022: अब्दुल सत्तारांनी कोट्यवधींचा घोटाळा केला, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा; अजित पवारांची मागणी

व्हिडीओत काय आहे?

जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad) पोस्ट केलेला व्हिडीओ, एका हिरकणी कक्षांमधील असल्याचं दिसतंय. या व्हिडीओत मंत्री दादा भुसे दोन तरुणांना शिवीगाळ करत मारहाण करताना दिसून येत आहे. व्हिडीओ पोस्ट करताना जितेंद्र आव्हाड यांनी दादा भुसे यांच्यावर कारवाई कधी होणार? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.

जितेंद्र आव्हाड पोस्टमध्ये काय म्हणाले?

ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करताना, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'पोलिसांसमोर एखाद्या व्यक्तीला मारहाण करण्यात येत आहे, कायदा सुव्यवस्थेचं काय? मंत्री दादा भूसे (Dada Bhuse) फटकावतात. शिव्या देतात, मुख्यमंत्री साहेब... कुठला गुन्हा पोलिस घेणार... पोलिसांसमोर मारले.. माझा नग्न फोटो फेसबुकवर टाकणाऱ्याला आपण मांडीवर  बसवलत. सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौज उभी केलीत. सुप्रीम कोर्टामध्ये रात्री त्या विकृत बरोबर आपली बैठक झाली... आता बोला', असा सवालही आव्हाड यांनी विचारला आहे.

दरम्यान, व्हिडीओत मंत्री दादा भुसे या तरुणांना शिवीगाळ करत मारहाण करताना दिसून येत आहे. या तरुणांची नेमकी चूक काय होती? कोणत्या कारणासाठी दादा भुसे तरुणांना मारहाण करत आहेत? हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे? याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर याची चर्चा सुरु आहे. यावर सत्ताधाऱ्यांकडून काय उत्तर देण्यात येतं ? विरोधक याबाबत हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार का? हे लवकरच समजेल. 

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com