two real brothers dies of electrocution in panhala near kolhapur saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Crime News : दाेघा सख्या भावांना पावनगडावरून फेकून दिले, पाच जण पाेलीसांच्या ताब्यात

पन्हाळा विभागाचे पाेलीस या घटनेची कसून चाैकशी करीत आहेत.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

ओढ्याला खेकडे पकडायला गेलेल्या दोघा सख्ख्या भावांचा शिकऱ्यांनी शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या तारांमुळे मृत्यू झाल्याची घटना आज (साेमवार) काेल्हापुर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील राक्षी येथे उघडकीस आली. गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या दाेन्ही भावांचा शाेध आज अखेर त्यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर नातेवाईकांनी थांबविला. (Maharashtra News)

पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार वन्य प्राण्यांची तलावाच्या जवळ विजेचा शाॅक देऊन चोरटया शिकारी केल्या जातात. चोरट्या शिकारीचे भिंग फुटू नये म्हणून पाच संशयितांनी नुकत्याच घडलेल्या घटनेनंतर मृत दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह पावनगडावरून (fort) फेकून दिले होते.

पोलीस आणि गावकऱ्यांच्या शोध मोहिमेत झुडपात फेकून दिलेल्या दोघा भावांचे मृतदेह आज (साेमवार) हाती लागले. जोतिराम सदाशिव कुंभार (वय ६४) आणि नायकू सदाशिव कुंभार (वय ६०) अशी मृत दोघा सख्या भावांची नावे आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यांचे नातेवाईक व गावकरी गेल्या चार दिवसांपासून त्यांचा शोध घेत होते. या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पाेलीसांनी दिली. पन्हाळा विभागाचे पाेलीस या घटनेची कसून चाैकशी करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT