Shirur : फुल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात; जाणून घ्या शेवंती, झेंडूच्या फुलांचा भाव

Diwali 2023 : कृत्रिम फुलांवर बंदी घातली पाहिजे अशी भूमिका शेतकरी मांडताना दिसताहेत.
marigold shevanti flowers prices slashed in shirur
marigold shevanti flowers prices slashed in shirursaam tv
Published On

Shirur News : सध्या दिवाळीचा सण सुरू आहे. त्यामुळे झेंडू शेवंती यासारख्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु मागणी जरी मोठ्या प्रमाणात असली तरी फुलांना पाहिजे तो बाजारभाव मिळत नाही असे चित्र आहे. (Maharashtra News)

marigold shevanti flowers prices slashed in shirur
Talegoan MIDC : दिवस 33 वा... सरकारच्या विराेधात जनरल मोटर्सच्या कामगारांचे मुंडन आंदाेलन

झेंडूसह (marigold) शेवंतीच्या फुलांना अवघा 20 ते 30 रुपये किलोचा बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे केलेला खर्च आणि मजुरी खर्चही निघत नसल्याने फुल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

याबराेबरच गणपती, दसरा आणि दिवाळी (diwali) या उत्सवांत शेतक-यांना त्यांच्या फुलांना उत्तम दर मिळेल अशी खात्री असते. फुलांची आवक माेठ्या प्रमाणात असली तरी प्लास्टिकची फुले बाजारात विक्रीसाठी असल्याने नैसर्गिक फुलांच्या विक्रीत देखील घट हाेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी कृत्रिम फुलांवर बंदी घातली पाहिजे अशी भूमिका मांडताना देखील दिसतात.

Edited By : Siddharth Latkar

marigold shevanti flowers prices slashed in shirur
Sambhajiraje Chhatrapati Viral Video : चर्चा तर हाेणारच! संभाजीराजेंना लागले मुख्यमंत्री हाेण्याचे वेध (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com