Palghar रुपेश पाटील
महाराष्ट्र

Palghar: मच्छिमारांच्या जाळ्यात दोन दुर्मिळ फिनलेस पॉरपॉइज

दिसायला अगदीच दुर्मिळ आणि काही प्रमाणात व्हेल माशांसारख्या दिसणाऱ्या या दोन्ही माशांना सुखरूप खोल पाण्यात सोडण्यात आले आहे.

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

पालघर - मच्छिमारांच्या जाळ्यात दोन फिनलेस पॉरपॉइज या दुर्मिळ माशांची मच्छीमारांकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दुर्मिळ असलेले हे दोन मासे तारापूर येथे समुद्रकिनाऱ्या लगत लावण्यात आलेल्या मासेमारी (Fishing) जाळ्यात अडकले असून मच्छीमारांनी जाळे तोडून या माशांना (Fish) जीवनदान दिले आहे. दुर्मिळ असलेला या माशांना पाहण्यासाठी नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यावर (Ocean) एकच गर्दी केली होती. (Two rare finless porpoise in fishing nets)

हे देखील पहा -

पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या तारापूर येथील जगदीश विंदे यांनी समुद्रकिनाऱ्यावर मासेमारी करता जाळे लावले होते. मात्र काही काळानंतर या जाळ्यात या मच्छीमाराला दुर्मिळ असे दोन मासे आपली सुटका करण्यासाठी धडपड करत असल्याचं लक्षात आलं. वेळीच विंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने मासेमारी जाळी तोडत या दोन्ही माशांची सुखरूप सुटका केली. दिसायला अगदीच दुर्मिळ आणि काही प्रमाणात व्हेल माशांसारख्या दिसणाऱ्या या दोन्ही माशांना सुखरूप खोल पाण्यात सोडण्यात आले आहे.

जगदीश शिंदे यांच्या जाळ्यात अडकलेले हे दुर्मिळ मासे फिनलेस पॉरपॉइज प्रजातीचे होते . हा दुर्मिळ मासा भारताच्या समुद्र किनारपट्टी पासून सुमारे शंभर ते दोनशे किलोमीटर पर्यंत खोल समुद्रात आढळून येत असून थंडीच्या काळात हे मासे उष्ण कटिबंधीय समुद्रात येत असतात . या माशाची लांबी जवळपास दोन मीटर पर्यंत असून वजन साधारणतः 35 ते 40 किलो पर्यंत होते. फिनलेस पॉरपॉइज हे मासे दुर्मिळ असून त्यांचे जतन आणि संवर्धन आवश्यक असल्याचे पर्यावरणप्रेमींकडून सांगण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

Sillod Assembly Election: भाजप आणि उद्धवसेनेचे सूर जुळले; ठाकरेंनीच दिली हाक

Jayant Patil : देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्धार; जयंत पाटील यांचा मोठा दावा

Chanakya Niti: या 3 सवयी असणाऱ्या व्यक्तीपासून कायम दूर राहा, आयुष्यात होईल पश्चात्ताप

Sillod News : सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT