Police crime in latur Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! आईला शिवीगाळ करणाऱ्याची दगडाने ठेचून हत्या, दोघांना अटक

यवतमाळ जिल्ह्यात धक्कादायक घटनेमुळं खळबळ माजली आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय राठोड

यवतमाळ : जिल्ह्यात धक्कादायक घटनेमुळं खळबळ माजली आहे. क्षुल्लक कारणावरून हत्येची घटना घडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या (Police) हद्दीत गुणवंतराव देशमुख परिसर कवडीपूरमध्ये मृतदेह आढळला आहे. अजय शालीकराव येवले (४०) असं मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे.येवले या व्यक्तीनं गजाननच्या आईला शिवीगाळ केली होती.याचा राग मनात धरून गजानन काळे आणि शेख समीर शेख सलीम यांनी येवलेची दगडाने ठेचून हत्या केली. याप्रकरणी (culprit arrested) दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. (two people kills a person using abuse language to mother)

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यात क्षुल्लक कारणावरून हत्येची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस आणि वसंतनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा कसून तपास केल्यानंतर काही तासांतच आरोपींच्या मुसक्या आवळल्या. गजानन काळे आणि शेख समीर शेख सलीम अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे दोन्ही आरोपींना पुसद पुसद बस्थनाकातून अटक केली.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT