धक्कादायक! नदीत उडी घेत अल्पवयीन प्रेमीयुगुलांनी संपवलं आयुष्य Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! नदीत उडी घेत अल्पवयीन प्रेमीयुगुलांनी संपवलं आयुष्य

चंद्रपूरच्या अल्पवयीन प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे नववीतील मुलगी आणि अकरावीतील मुलगा होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गडचिरोली : चंद्रपूरच्या Chandrapur अल्पवयीन प्रेमीयुगुलांनी आत्महत्या Suicide केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे नववीतील मुलगी आणि अकरावीतील मुलगा होते. चंद्रपूर मध्ये राहत असलेल्या या दोघांनी गडचिरोलीत जाऊन हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या दोघांचे मृतदेह आरमोरी तालुक्यातील शिवणी घाटावर आढळले आहेत. मुलीचे वय अवघे १५ तर मुलाचे वय १७ वर्ष होते. हे दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्याततील रहिवासी होते.

हे देखील पहा-

एकमेकांचे हात बांधून आत्महत्या;

आरमोरीच्या पुलावरून वैनगंगा नदीपात्रात दोघांनीही एकमेकांच्या हाताला दोर बांधून गडचिरोली येथील आत्महत्या केली आहे. पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तविला की, प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली असावी.

कुटुंबाकडून शोधाशोध;

हे दोघेही ३ ऑगस्टपासून बेपत्ता होते. बेपत्ता आल्यामुळे दोघांच्या कुटुंबियांनी सगळीकडे शोधाशोध देखील केली. मात्र त्यांचा काही थांग पत्ता लागला नाही. शोधशोध केल्यावर हे दोघे कुठेही सापडत नसल्याने दोघांच्या कुटुंबियांनी पोलिसांना कळविले होते.

ब्रम्हपुरी पोलिसांनी गडचिरोली पोलिसांना Police याबाबतची माहिती दिली होती. त्यांनी त्याबाबतचा तपास केला. त्यादरम्यान आरमोरी तालुक्यातील शिवणी घाटावर दोन मृतदेह Dead Bodies आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिासांनी अधिक चौकशी केल्यानंतर हे मृतदेह त्या दोघांचे असल्याचे समोर आले.

ब्रम्हपुरी पोलिसांनी शोध मोहीम राबविली त्यादरम्यान त्या अल्पवयीन युवकाने पोलिसांनी संपर्क केल्यावर प्रतिसाद दिला. पोलिसांनी त्या दोघांना घरी परतण्याचा सल्ला दिला पण, सोबत त्याची मैत्रीण नसल्याचे त्याने नमूद केले. पोलिसांनी 'खोटे बोलू नको, घरी परता', असे सांगितल्यावर त्याने लगेच फोन कापला. त्या दोघांचा तपास लावणे सुरु होते, शोधाशोध झाली. पोलिसांना मोबाइल लोकेशन वरून वडसाजवळ त्याचा ठिकाणाचा पत्ता मिळाला. शोध लागल्यावर एकमेकांच्या हाताला दोर बांधून त्यांनी वैनगंगेत आत्महत्या केली होती.

दोघांचे कुटुंबीय या प्रकाराने हादरुन गेले आहे. या अल्पवयीन प्रेमीयुगुलांनी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ऐरो सूर्यकिरण शोचे आयोजन

Crime: तरुणीला मध्यरात्री बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांनी फावड्याने हल्ला करत दोघांना जागीच संपवलं

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत ₹२००० तुम्हाला मिळणार की नाही? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

Ukdiche Modak Recipe: अस्सल पारंपारिक पद्धतीचे उकडीचे मोदक कसे बनवायचे?

ICC vs BCB: वर्ल्डकपआधी बांगलादेशच्या अडचणी वाढल्या, ICC नं फटकारलं, सरकार आता काय निर्णय घेणार?

SCROLL FOR NEXT