Crime
Crime Saam Tv
महाराष्ट्र

टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलवरील दोघे ठार

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर ः राहुरी येथे आज (गुरुवारी) दुपारी सव्वादोन वाजता नगर-मनमाड महामार्गावरील मुळा नदीवरील पुलाजवळ भरधाव टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात, दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले.

‌भानुदास विलास चव्हाण (वय ३६, रा. वरवंडी) व गोरक्ष राधुजी गायकवाड (वय ३०, रा. तास, ता. पारनेर, हल्ली रा. कोंबडवाडी, वरवंडी) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही दुचाकीवरून (एमएच १७ एन ७८९१) राहुरी खुर्द येथे चालले होते. Two killed on motorcycle at Rahuri

मुळा नदीच्या पुलाजवळील ज्ञानेश्वर उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर असतांना भरधाव चाललेल्या टेम्पोने (एमएच १६ सीसी ६१७८) दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. त्यात, दुचाकीवरील दोन्ही तरुण जागीच ठार झाले. दुचाकी अक्षरशः चक्काचूर झाली. रस्त्याच्या कडेला फरसाण विक्रीसाठी बसलेली महिला बालंबाल वाचली. विक्रीकरिता ठेवलेले फरसाण व मिठाई रस्त्यावर अस्ताव्यस्त पडली होती.

दरम्यान, टेम्पो चालक कमलेश उत्तम नलगे (रा. सुपे, ता. पारनेर) भरधाव वेगाने नगरच्या दिशेने निघून फरार झाला. गणेश भांड व रवी आभाळे (दोघेही रा. राहुरी खुर्द) या तरुणांनी दुचाकीवरुन टेम्पोचा पाठलाग केला. नांदगाव शिवारात त्या टेम्पोला अडवून, टेम्पो चालकाला घटनास्थळी आणले. संतप्त नागरिकांनी टेम्पो चालकाची यथेच्छ धुलाई करुन, पोलिसांच्या हवाली केले. रात्री उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.Two killed on motorcycle at Rahuri

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruby Roman Grapes : ही द्राक्षे तयार करण्यासाठी लागली १४ वर्षे, एका घडाची किंमत आहे १० लाख

Raj Thackarey: उद्धव ठाकरे गेल्या १०वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा सवाल

Home Decor Idea : कमी खर्चात बर्ड थे पार्टीसाठी घर कसं सजवाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

Raj Thackeray: '5 वर्ष राणे मुख्यमंत्री असते तर...', तो किस्सा सांगत राज ठाकरेंनी केलं नारायण राणे यांचं कौतुक

RCB Vs GT : आरसीबीच्या बॉलर्ससमोर गुजरात ढेर; बेंगळुरूसमोर १४७ धावांच लक्ष्य

SCROLL FOR NEXT