घड्याळ बांधताच भाजपनेत्याला अजितदादांनी दिला शब्द

नामदेव राऊत यांचे राष्ट्रवादीत स्वागत करताना उपमुख्यमंत्री अजित पवार.
नामदेव राऊत यांचे राष्ट्रवादीत स्वागत करताना उपमुख्यमंत्री अजित पवार.

अहमदनगर : कर्जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत निधी कमी पडू दिला नाही. नामदेव राऊत आणि सहकाऱ्यांनी मोठ्या विश्वासाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. इथून पुढेही शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना ताबडतोब पूर्ण करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.BJP leader Namdev Raut joins NCP abn79

आज कर्जत नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी चार नगरसेवक आणि पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह हातातील कमळ सोडून घड्याळ बांधले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते व आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

नामदेव राऊत यांचे राष्ट्रवादीत स्वागत करताना उपमुख्यमंत्री अजित पवार.
कोरोनाचा कहर, पारनेरमध्ये १२ गावांत लॉकडाउन

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बारामती एग्रोचे सुभाष गुळवे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, शहराध्यक्ष सुनील शेलार, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष प्रा. विशाल म्हेत्रे, नगरसेवक बापूसाहेब नेटके व लालासाहेब शेळके, प्रसाद ढोकरीकर, उद्योजक दीपक शिंदे, रवी पाटील, नितीन तोरडमल, भास्कर भैलुमे, रज्जाक झारेकरी आदी उपस्थित होते.

पवारांचे नेतृत्व

नामदेव राऊत म्हणाले, मिळालेल्या संधीचे सोने करीत शहराचा विकास साधला.आता शहराचा सर्वांगीण विकास आणि स्वप्नातील कर्जत उभारणी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली केली जाणार आहे. तसेच जेष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे याकामी मार्गदर्शन मिळणार आहे.BJP leader Namdev Raut joins NCP abn79

नगरसेवकांसह राष्ट्रवादीत

नामदेव राऊत यांना शहरात मानणारा मोठा वर्ग आहे. सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा, मदतीला धावून जाणारा अशी सर्वदूर ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका हर्षदा काळदाते, नगरसेविका उषा राऊत, नगरसेविका वृषाली पाटील यांचे पती प्रा. किरण पाटील, नगरसेवक सुधाकर समुद्र यांचे चिरंजीव सतीश समुद्र, अमृत काळदाते, भाजप अल्पसंख्याक सेल जिल्हा सरचिटणीस इरफान सय्यद, माजी शहराध्यक्ष रामदास हजारे, मार्केट कमिटी संचालक बजरंग कदम, सरपंच दीपक ननावरे, मंगेश नेवसे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com