>> सुशील थोरात, साम टीव्ही
Ahmednagar Two Groups Clashed: शनिवारी रात्री अकोल्यात दोन गट भिडल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता अहमदनगरमध्येही दोन गटांत तुफान राडा झाला आहे. रविवारी रात्री शेवगाव शहरामध्ये दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली.
या घटनेत काही लोक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना नेमकी कशामुळे झाली याबाबत अद्यापही पोलीस प्रशासनाने खुलासा केलेला नाही. गाडीचा कट लागल्याचं कारणावरून दोन गटात दगडफेक झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून समोर येत आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून दगडफेक करणाऱ्या विरोधात 250 ते 300 जणांविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आत्तापर्यंत 31 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. सध्या शेवगाव येथे तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या घटनेत काही लोक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना नेमकी कशामुळे झाली याबाबत अद्यापही पोलीस प्रशासनाने खुलासा केलेला नाही.
गाडीचा कट लागल्याचं कारणावरून दोन गटात दगडफेक झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून समोर येत आहे. या हिंसाचारात शेवगाव पोलीस ठाण्याचे ४ पोलीस जखमी झाल्याचे कळते आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केला. (Latest Breaking News)
अकोला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसक जमावाने काही वाहनांची तोडफोड केली. किरकोळ वादातून झालेल्या हिंसक घटनेनंतर जुने शहर पोलीस ठाण्याजवळ मोठा जमाव जमला होता. या हिंसक जमावाने परिसरातील काही वाहनांना लक्ष्य केले. यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.