Saam Tv
Saam Tv
महाराष्ट्र

दुर्देवी घटना! आरफळ कॅनॉलमध्ये दोन मुली बुडाल्या; एका मुलीचा मृतदेह सापडला

विजय पाटील

सांगली: सांगली (Sangli) जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील विसापूर येथे काल दुपारी कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुली आरफळ कॅनॉलमध्ये बुडाल्या आहेत. यापैकी एका मुलीचा मृतदेह सापडला. तर दुसरी अद्याप बेपत्ता आहे. ही दुर्दैवी घटना काल दुपारी घडली. यामध्ये आरोही विक्रम गुजले वय ४ वर्षे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुर्गा कुमार मदने वय १८ ही अद्याप बेपत्ता आहे. या घटनेची माहिती पोलीस पाटील संदीप पाटील यांनी तासगाव पोलिसात (Police) दिली.

हे देखील पाहा

पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी की, विसापूर येथील जुन्या बामणी रोडजवळ बेरडकी मळ्यात पद्मा कुमार मदने दुपारी एकच्या दरम्यान त्यांच्या कुटुंबातील आरोही व दुर्गा या घराजवळून जात असणार्‍या आरफळ कॅनॉलमध्ये कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुताना अचानक आरोही कॅनालच्या पाण्यामध्ये पडली. तिला वाचवण्यासाठी दुर्गाने कॅनॉलमध्ये उडी मारली. मात्र, दुर्दैवाने दोघी वाहून गेल्या. यापैकी आरोही ही घटनास्थळापासून १ किलोमीटर अंतरावर मृतावस्थेत सापडल. तर दुर्गा अद्याप बेपत्ता आहे. आरोही ही आपल्या नातेवाईकांकडे आली होती.

शेतात (Farm) काम करत असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ शोधमोहीम सुरू केली. त्यांना आरोही घटनास्थळापासून १ किमी अंतरावर सापडली. तिला तात्काळ बाहेर काढले असता पण पाण्यामध्ये बुडाल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. गावातील चाळीस ते पन्नास तरुणांनी गावापासून पाच ते सहा किलोमीटर परिसरातील आरफळ कॅनॉलमध्ये शोध घेतला. मात्र रात्री उशिरापर्यंत दुर्गा सापडली नाही. अद्यापही शोधकार्य सुरू आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! मुंबईचा विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

Custard Apple Benefits : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ उपयुक्त; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Special Report : बारामतीत मडकं फोडणारा "तो" कार्यकर्ता कोण?

SCROLL FOR NEXT