महाराष्ट्र

Dussehra Melava: बीडमध्ये एकाच दिवशी दोन दसरा मेळावे; मनोज जरांगे- मुंडे आमनेसामने

Girish Nikam

बीडमध्ये यंदा दोन दसरा मेळावा होणार आहेत. नारायणगडावर मनोज जरांगेंचा प्रथमच दसरा मेळावा होतोय. तो भव्यदिव्य होण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. तर सावरगाव मधील भगवान भक्ती गडावर मुंडे बहिण-भावाचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यातून मराठवाड्याची राजकीय दिशा ठरणार आहे. पाहूया एक रिपोर्ट

लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात ‘मराठा विरुद्ध ओबीसी’ असा संघर्ष पहायला मिळाला. त्याचा फटका महायुतीला बसला. याच पाश्वभूमिवर राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीडमध्ये यंदा दोन दसरा मेळावा होणार आहेत. दरवर्षी पंकजा मुंडेच्या दसरा मेळाव्याची उत्सुकता असायची. यंदा मात्र त्याच बीडमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचाही मेळावा होणार असल्याचं सगळ्याच स्तरावर उत्सुकता आहे. या दोन्ही मेळाव्यांमधून मराठवाड्यातील विधानसभा निवडणुकीची प्रचारदिशा स्पष्ट होणार आहे. दरम्यान मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून जरांगेंच्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरु आहे.

जरांगेंच्या मेळाव्याला प्रत्येक जिल्ह्यातून समाजबांधव जाणार आहेत. प्रत्येकाला बुंदीचा प्रसाद मिळणार आहे. 500 क्विंटल बुंदीची तयारी सुरु आहे. जालना जिल्ह्यातून 9 हजार चारचाकी वाहनातून लाखो लोक मेळाव्याला येणार आहेत. प्रत्येक कुटुंबातून एकजण या मेळाव्याला येण्याचं नियोजन करण्यात आलंय. या मेळाव्यासाठी समन्वयकांनी संभाजीनगरात 35 बैठका घेतल्यात.

दुसरीकडे पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याचीही तयारी सुरु आहे. आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी मेळाव्याला येण्याचं आवाहन केलंय. तर मराठ्यांना आरक्षण देणार नाही, अशी खून्नस नेमकी कोणामध्ये आहे ?हे मी नारायणगडावर सांगेन असं जरांगेंनी साम टीव्हीशी संवाद साधताना सांगितलं.

एकेकाळी पंकजा मुंडेंना भगवान गडावर मेळावा घेण्यास विरोध करणारे त्यांचे बंधू मंत्री धनंजय मुंडे यंदा प्रथमच त्यांच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ताई-दादांची एकी भगवानभक्ती गडावर दिसणार आहे. परळी विधानसभा निवडणुकीमध्ये यंदा ‘कमळ’ हे चिन्ह असणार नाही. सध्याच्या राजकीय संघर्षात मेळाव्यात मुंडे बहिण-भाऊ कार्यकर्त्यांना काय दिशा देणार याची उत्सुकता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'अजित पवार-प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं'; आमदार अमोल मिटकरींचं विधान

Fact Check : एक गोळी खाल्ल्याने व्यायामाची गरज नाही? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Jammu-Kashmir : 'आप'ला पाठिंबा NC ला ! एकुलत्या एक आमदाराचं नायब राज्यपालांना पत्र

Bharat Gogawale: 'काम करणारा भाऊ की, XXX बनवणारी बहीण हवी', भरत गोगावलेंची महिला नेत्याबद्दल बोलताना जीभ घसरली

Nana Patole: 'मीच होणार मुख्यमंत्री', नाना पटोलेंचा मुखयमंत्रिपदावर दावा; CM पदावरून मविआत बिनसणार?

SCROLL FOR NEXT