टपाल कामगारांचा केंद्र सरकारविरोधात दोन दिवसांचा देशव्यापी संप SaamTVNews
महाराष्ट्र

टपाल कामगारांचा केंद्र सरकारविरोधात दोन दिवसांचा देशव्यापी संप

या संपामध्ये टपाल कामगारांच्या सर्व मान्यता प्राप्त संघटनांनसह इतर खाजगी व सरकारी सर्व संघटनांनी सहभाग घेतला आहे.

Krushnarav Sathe

पुणे : टपाल कामगार संघटनांनी दिनांक 28 व 29 मार्च रोजी आपल्या विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या विरोधात देशव्यापी संप पुकारला आहे. या संपामध्ये टपाल (Indian Post) कामगारांच्या सर्व मान्यता प्राप्त संघटनांनसह इतर खाजगी व सरकारी सर्व संघटनांनी सहभाग घेतला आहे. (Two-day nationwide strike of postal workers against central government)

हे देखील पहा :

टपाल कामगारांच्या मागण्या :

  • नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सुरू करा

  • खाजगीकरणाच्या हालचाली थांबवा व डाक मित्र योजना मागे घ्या

  • संघटनेच्या प्रतिनिधींना दोन टर्म पदावर राहण्यासाठी निर्बंध घालण्याचे आदेश मागे घ्या

  • पार्सल वितरणासाठी सुरू केलेली नोडल डिलिव्हरी बंद करा

  • कर्मचाऱ्यांची पिळवणूक करण्याचे थांबवा

  • कोव्हीड च्या साथीमुळे मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला दहा लाखाची मदत देऊन त्यांच्या घरातील एका व्यक्तीला कामावर त्वरित घेण्यात यावे

  • ग्रामीण डाक सेवक कर्मचाऱ्यांसाठी कमलेश चंद्रा कमिटीच्या शिफारशी त्वरित मान्य करा

  • फिनॅकल सर्व्हरची क्षमता वाढवा

  • थकीत अठरा महिन्यांचा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना त्वरित देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे.

या संपाबाबत के एस पारखी (प्रादेशिक सचिव नॅशनल असोशियन ऑफ पोस्टल एम्प्लाइज), राजेंद्र करपे (महाराष्ट्र सर्कल सचिव नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाक सेवक), देवदास देवकर (प्रादेशिक सचिव नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज पोस्टमन व एम टी एस), अमृता नेगीनहल सप्रे (नॅशनल युनियन ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन युनियन), एस बी कारले (नॅशनल युनियन ऑफ मेल मोटर सर्विस) यांनी वरील माहिती दिली व सर्व टपाल कर्मचाऱ्यांनी दिनांक 28 व 29 मार्च रोजी होणाऱ्या संपात सहभागी होऊन संप यशस्वी करावा असे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Maharashtra Winter Alert : गुलाबी थंडीची चादर! मुंबई-पुण्यासह राज्याचा पारा घसरला, पावसानंतर गारठा वाढला

Local Body Election : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शिवसेनेला धक्का, ठाकरे अन् शिंदेंचे शिलेदार फोडले

Thane Land Scam: ठाण्यात जमीन घोटाळा; २०० कोटींची जमीन ३ कोटीत लाटली, वडेट्टीवारांचा शिंदेंच्या मंत्र्यावर आरोप

Jupiter Retrograde 2025: 11 नोव्हेंबरपासून 'या' राशींची होणार बल्ले-बल्ले; गुरु वक्री होऊन देणार पैसा

SCROLL FOR NEXT