Nashik Accident Saam Tv
महाराष्ट्र

नाशिकमध्ये दोन कारचा भीषण अपघात, 5 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू

दोन्ही कारमधील 7 प्रवासी जखमी झाले आहेत.

अभिजीत सोनावणे

नाशिक – शहरातील एबीबी सिग्नलवर दोन कारचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. हा भीषण अपघात रात्री 1 वाजेदरम्यान घडला असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात 5 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू असून दोन्ही कारमधील 7 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 3 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. काहींच्या डोक्याला गंभीर इजा झाल्या आहेत. एका कारचा चालक गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.जखमींवर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहे.

हे देखील पहा -

महिंद्रा झायलो कार (MH1DC9746) आणि मारुती ब्रीझा (MH15GL3461) या गाड्याची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कार उलटल्या झाल्या होत्या. प्रवासी कारमधून बाहेर फेकले गेले होते. दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ब्रिझा कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ब्रिझामधील कारचालक मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT