Latur News Saam Tv
महाराष्ट्र

Latur: प्रशासनाचा वाळूमाफियांना दणका, वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले

वाळूमाफियाच्या दोन बोटी प्रशासनाकडून नेस्तनाबूत

दीपक क्षीरसागर

लातूर - निलंगा तालुक्यातील मांजरा व तेरणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवेध बाळू उपसा होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाल्याने महाराष्ट्र महसूल विभाग पोलीस प्रशासन व कर्नाटक पोलीस (Police) प्रशासनाने संयुक्त कार्यवाही करीत रात्री ११.२५ वाजता अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी जिलेटिनद्वारे स्फोट करून उध्वस्त केल्या. प्रशासनाच्या दबंग कारवाईमुळे वाळू माफियांना दणका बसला आहे. यामुळे अवेध वाळू उपसा करणाऱ्या व्यवसायिकांची धाबे दणाणले आहेत.

हे देखील पाहा -

निलंगा तालुक्यातून मांजरा व चेरणा नया वाहतात. या दोन नद्यांचा संगम महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर औराद शहाजानी व बांगरखेडा येथे होती. मांजरा तेरणा पात्रातील अवैधरित्या वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी अनेक वेळा प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत. तरीही प्रशासन याबाबत कसल्याही प्रकारची कार्यवाही करण्याची तसदी घेत नसल्याने वाळूमाफियांनी डोके वर काढले होते. शेतकयांनी अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन हायवा पकडून ठिय्या मांडून पंचनामा करून पोलीस ठाणेत जमा करण्यास भाग पाडले.

सायंकाळी निलंग्याचे तहसीलदार गणेश जाधव यांच्यासह त्यांचे सहकारी व औराद पोलिस ठाण्याचे सपोनि संदीप कामतांसह त्यांचे सहकारी महाराष्ट्राच्या हद्दीत व मेहकर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कारजे त्यांचे सहकारी कर्नाटक राज्याच्या बाजूस थांबून अवैधरित्यावाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी ताब्यात घेतल्या.

सदर प्रकरणी रात्री ११.२५ वाजता मांजरा नदी पात्रात महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर जिलेटिनद्वारे स्फोट करून उदध्वस्त करण्यात आल्या असल्याचे तहसीलदार गणेश जाधव यांनी सांगितले. महसूल व पोलिस प्रशासनाच्या दबंग कारवाईमुळे वाळू उपसा करणाचा माफियांचे धाबे दणाणले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाडमध्ये मनसे पधिकाऱ्याला मारहाण

Local Body Election : ठाकरेंची अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती, शिंदेंची शिवसेना एकाकी, रायगडचे राजकारण तापलं

Pune Crime: पुणे हादरलं! १८ वर्षीय प्रेयसीवर चाकूने हल्ला, प्रेमाचा थरारक शेवट

Honeymoon Destinations: लग्नानंतर हनिमूनसाठी महाबळेश्वर, माथेरान कशाला? भारतातली ही खास अन् शांत ठिकाणं ठरतील बेस्ट

Punha Shivajiraje Bhosle Collection : 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा हाऊसफुल, वीकेंडला कमाई किती?

SCROLL FOR NEXT