जागतिक तंबाखू विरोधी दिन; तंबाखू सेवनामुळे जगभरात दरवर्षी 'इतके' मृत्यू

भारतात होणारे मृत्यू दरवर्षी सुमारे १३ लाख इतके असल्याचा अंदाज आहे
World No Tobacco Day
World No Tobacco DaySaamTv
Published On

World No Tobacco Day 2022

मुंबई : धूम्रपान हे आरोग्यासाठी हानिकारक आहे, पण खरं तर धूम्रपान (Tobacco) संपूर्ण मानवजातीसाठी हानिकारक आहे. जीवनातील वाढत्या समस्यांसोबत तंबाखूचा वापर वाढत आहे आणि तो फक्त एवढ्यापुरताच मर्यादित नाही, तंबाखूमुळे आपल्या पृथ्वी मातेलाही धोका आहे. ३१ मे म्हणजे ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ हा एक असा दिवस आहे, जो दर वर्षी आपल्याला तंबाखूच्या वापरामुळे होणाऱ्या धोकादायक बदलांची आठवण करून देतो. (World No Tobacco Day The 80 lakh victims of death tobacco use world wide very years)

World No Tobacco Day
अॅव्होकाडोपासून घरच्या घरी खाद्य तेल अशाप्रकारे बनवा

तंबाखूच्या सेवनामुळे जगभरात दरवर्षी सुमारे ८० लाख व्यक्तींचे दुर्दैवी मृत्यू (Death) होतात. भारत हा तंबाखूचा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक आणि तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे आणि तंबाखूमुळे भारतात होणारे मृत्यू दरवर्षी सुमारे १३ लाख इतके असल्याचा अंदाज आहे. तंबाखूमुळे उद्भवणाऱ्या तोंडाच्या आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या उच्च घटना तर सर्वज्ञातच आहे. दीर्घकाळ तंबाखूच्या सेवनामुळे क्षयरोग होण्याची शक्यता २.५ पटींनी वाढते. एवढंच नाही तर तंबाखूची लागवड, उत्पादन, वितरण, सेवन आणि सेवनानंतरच्या टाकाऊ पदार्थांद्वारे पर्यावरणाची सुद्धा हानी होते.

सिगारेट तयार करण्यासाठी दरवर्षी जगभरात सुमारे ६० कोटी झाडे तोडली जातात. ज्यामुळे प्राणवायूच्या उपलब्धतेत तीव्र कमतरता निर्माण होते. तसेच जगभरात सुमारे ८.४ कोटी टन इतका कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित केला जातो. ज्यामुळे वातावरणावर खूप वाईट परिणाम होतो. तंबाखूच्या शेतीसाठी दरवर्षी २० लाख हेक्टर जमीन साफ केली जाते, जी उपयुक्त संसाधने वापरते. आधीच पाण्याची टंचाई असलेल्या युगात, एक सिगारेट तयार करण्यासाठी सुमारे ३.७ लिटर पाणी वापरले जाते.

World No Tobacco Day
रिकाम्या पोटी ग्रीन टी पित असाल तर होऊ शकते नुकसान !

यावर्षीच्या जागतिक तंबाखू विरोधी दिनासाठी जागतिक आरोग्य संघटनेने ‘पर्यावरणाचे रक्षण’ ही मध्यवर्ती संकल्पना सुचविलेली आहे. या अनुषंगाने आवर्जून नमूद करण्यात येते की, आता आपण मानव जातीने एकत्रितपणे तंबाखूच्या धोक्यापासून स्वतःचे आणि पृथ्वी मातेचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, या वाढत्या संकटाचा सामना करण्यासाठी आपण काही महत्त्वाच्या सुधारणा करणे ही काळाची गरज आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अखत्यारितील व्यसनमुक्ती केंद्र हे अंधेरी (पश्चिम) परिसरात असणा-या भरडावाडी प्रसूतिगृह इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर कार्यरत आहे. या केंद्रामध्ये दारू, चरस, गांजा, भांग, ब्राऊन शुगर, एम‌. डी यासह तंबाखू इत्यादींसारख्या विविध घातक पदार्थांच्या व्यसनी रुग्णांवर आंतररुग्ण तसेच बाह्यरुग्ण विभागात उपचार केले जातात. २० खाटांची क्षमता असलेले हे केंद्र निर्विषिकरण उपचार, समूह चर्चा, समुपदेशन सत्रे यासारख्या सेवा पुरवते. तंबाखूचे व्यसन असलेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीचा सल्ला, मोटिव्हेशनल एन्हांसमेंट थेरपी, हार्म रिडक्शन थेरपी आणि सपोर्टिव्ह थेरपी यासारख्या पध्दतींचा वापर या ठिकाणी केला जातो.

आजच्या म्हणजेच ३१ मे रोजीच्या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त व्यसनमुक्ती केंद्रात‌र्फे मुंबई पोलिस दलाच्या अखत्यारितील डी. एन. नगर पोलिस स्टेशन आणि वर्सोवा पोलिस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांसाठी जागरुकता सत्र आयोजित करण्यात आले आहे. तसेच पश्चिम उपनगरातील सहायक वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी ‘तंबाखू अवलंबित्व आणि त्याचे व्यवस्थापन’ यावर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

या उपक्रमांमध्ये तंबाखूचे आपल्या व आपल्या आजूबाजूच्या लोकांवर होणारे दुष्परिणाम, तंबाखूमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान, तंबाखूचे अवलंबित्व, त्याचे नियंत्रण आणि व्यवस्थापन याबद्दल महत्त्वाची माहिती देण्यात येणार आहे. तथापि, सदर व्यसनमुक्ती केंद्राने स्वतःला केवळ वर नमूद केलेल्या मुद्द्यापुरते मर्यादित ठेवले नाही. या केंद्रात केलेला प्रत्येक प्रयत्न हा नेहमीच रुग्णांच्या हिताचा राहिला आहे आणि लोकांना व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी मदत करणे, हीच या केंद्राची प्रमुख संकल्पना आहे.

दिनांक ३१ मे २०२२ पासून असंसर्गजन्य रोग कक्ष, सार्वजनिक आरोग्य खाते यांच्या तर्फे ‘इंडियन डेन्टल असोसिएशन’ यांच्या समन्वयाने मुंबईतील नागरिकांकरिता मौखिक आरोग्य व कर्करोग जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. ही शिबिरे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे दवाखाने आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com