बीड: वैद्यनाथ मंदिर RDXने उडवण्याच्या धमकी प्रकरणी दोघे जण ताब्यात!
बीड: वैद्यनाथ मंदिर RDXने उडवण्याच्या धमकी प्रकरणी दोघे जण ताब्यात! विनोद जिरे
महाराष्ट्र

बीड: वैद्यनाथ मंदिर RDXने उडवण्याच्या धमकी प्रकरणी दोघे जण ताब्यात!

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड: देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या, परळी येथील वैद्यनाथ मंदिरला आरडीएक्सने उडवून देण्याचं पत्र आल्यानं, बीड (Beed) जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. याप्रकरणी परळी व नांदेड पोलिसांनी नांदेड (Nanded) येथील दोघांना ताब्यात घेतलं आहे.

हे देखील पहा-

वैद्यनाथ मंदिराच्या विश्वातांच्या नावाने काल उशिरा एक पत्र आलं होतं. यामध्ये तात्काळ 50 लाख रुपये, मी दिलेल्या पत्त्यावर पाठवा, अन्यथा वैद्यनाथ मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवून टाकील. अशा धमकीचे पत्र आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

याप्रकरणी विश्वास्तांनी दिलेल्या तक्रारीवरून, परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तर गुन्हा दाखल होताच परळी पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. यादरम्यान दहशतवाद विरोधी पथकासह श्वानपथकाला देखील वैद्यनाथ मंदिर परिसराची पाहणी करण्यासाठी पाचारण करण्यात आलं होतं.

त्यानंतर पत्रात उल्लेख असलेल्या नावाबाबत पोलिसांनी नांदेड येथे जाऊन दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. एक व्यक्ती विमा प्रतिनिधी असून दुसरा बांधकाम व्यावसायिक आहे. प्राथमिक माहितीवरून दहशतवाद विरोधी पथकाने त्या आरोपींची चौकशी केली असता, आमच्यासोबत खोडसाळपणा केला गेला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पुढील दोन दिवसांत आमची कोर्टाची तारीख असून, ज्यांच्याशी वाद चालू आहे. त्याच व्यक्तींनी आमच्या नावाचा वापर करून पत्र लिहिले असल्याचा आरोपही ताब्यात घेतलेल्या दोघांनी केला आहे. ताब्यात घेतलेल्या लोकांकडून अधिकची माहिती घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. अशी माहिती परळी शहर ठाण्याचे निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Srikanth Film : श्रीकांत बोला यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांना भावला, राजकुमार रावच्या अभिनयाचे कौतुक

Maharashtra Unseasonal Rain: नाशिकसह अर्ध्या महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपलं; फळबागांचं मोठं नुकसान, शेतकरी संकटात

Mother's Day 2024 : 'मदर्स डे'ला स्पेशल बनवायचंय? मुंबईतील 'या' नयनरम्य ठिकाणी आईला नक्की घेऊन जा

Mothers Day 2024: मदर्स डे'च्या दिवशी पाठवा खास शुभेच्छा

Petrol Diesl Rate (12th May 2024): मुंबई आणि पुण्यासह मेगा सिटीमध्ये पेट्रोल स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे दर

SCROLL FOR NEXT