आमदार नीलेश लंके-तहसीलदार ज्योती देवरे 
महाराष्ट्र

तहसीलदार अॉडिओ क्लिपप्रकरणात ट्विस्ट, लंके अण्णांच्या दरबारी

सचिन आगरवाल

अहमदनगर : जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिपमुळे राज्यभरात कालपासून व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. राज्यातील महसूल विभागातही या क्लिपची चर्चा सुरू आहे. कोविड सेंटरमुळे राज्यभरात नावारूपाला आलेल्या राष्ट्ववादीचे आमदार नीलेश लंके यांच्यावर तहसीलदार देवरे यांचे आडवळणाने आरोप सुरू आहेत. याबाबत नीलेश लंके यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. स्वतःची चौकशी सुरू आहे. त्यातून वाचण्यासाठीच त्यांनी केविलवाणे आरोप केलेत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.Twist in the dispute between Tehsildar Jyoti Deore-MLA Lanke abn79

या प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या चित्रा वाघ आणि भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई याही देवरे यांच्या बाजूने उतरल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. आज सकाळपासून देवरे यांच्याबाबतचा अहवाल सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तहसीलदार देवरे यांच्या आत्महत्येच्या क्लिपच्या मुळाशी हा अहवालच असल्याचे बोलले जात आहे.

काय आहे अहवाल

तहसीलदार ज्योती देवरे यांच्याबाबतचा अहवाल अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ६ ऑगस्टला तयार करून नाशिकच्या विभागीय आयुक्तांना पाठविला होता. त्यानंतर ही क्लिप बाहेर आल्याची चर्चा आहे. या अहवालात जिल्हाधिकारी यांनी म्हंटले आहे की, शासकीय कामात नितांत सचोटी व कर्तव्यपरायणता ठेवलेली नाही. कामाची जबाबदारी नीटपणे पार पाडलेली नाही.

वरिष्ठांच्या आदेशाचा भंग केला आहे. पारनेर येथील एका कोविड सेंटर विरोधातील तक्रारीच्या अनुषंगाने तपासणी करताना तहसीलदार देवरे यांनी चौकशी समितीस कोणतेही कागदपत्र उपलब्ध करून दिले नाहीत. यावरून त्यांनी कर्तव्यात, जबाबदारीमध्ये अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचे दिसून येतो, असेही अहवालात नमूद केले आहे. Twist in the dispute between Tehsildar Jyoti Deore-MLA Lanke abn79

जप्त वाळूसाठ्याबाबत नियमानुसार अंतिम आदेश पारित करून सदर रक्कम शासनाच्या तिजोरीत भरणा करणे अभिप्रेत होते. परंतु या प्रकरणी वालुसाठ्याच्या लिलावबाबत अंतिम आदेश पारित करण्यात आलेले नाहीत. ही बाब शासनाचे नुकसान करणारी असल्याचे ताशेरे अहवालात ओढण्यात आलेले आहेत.

आमदार लंके अण्णांच्या दरबारी

आमदार नीलेश लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेत या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. तहसीलदार यांच्यावर प्रस्तावित असलेल्या अहवालाची माहिती त्यांनी अण्णांना दिली. आपल्या कामात त्या अडथळा आणत असल्याचीही माहिती त्यांनी दिली. अण्णांनी या प्रकरणात पारनेर तालुक्याची बदनामी थांबवण्याचे आवाहन केले. या प्रकरणी प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणार असल्याचीही अण्णांनी लंके यांना सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025: 800 वर्षांनंतर दिवाळीला बनणार 5 राजयोग; 'या' 3 राशी रातोरात होणार श्रीमंत

IND vs ENG Women: फक्त ४ धावांसाठी टीम इंडियाने सामना गमावला, उपांत्य फेरीची धकधक वाढली

शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

SCROLL FOR NEXT