तुळजापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका युवकाचा झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. झोपेतच तरूण जोरजोरात ओरडत असल्यामुळे त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एकुलत्या एक मुलाचा असा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सोमनाथ प्रकाश कोरे (वय वर्ष २४) असे मृत तरूणाचे नाव आहे. सोमनाथ नियमितप्रमाणे आई वडिलांसोबत रात्री जेवला आणि झोपायला गेला. मात्र, अचानक मध्यरात्री त्याला त्रास जाणवू लागला. रात्रीच युवक वेदनेने विव्हळत होता. जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकताच आई-वडिलांनी तत्काळ धाव घेतली. त्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो उठलाच नाही.
ओरडल्यानंतर मुलगा अचानक शांत झाला. नंतर घाबरलेल्या आई वडिलांनी त्याला तातडीने तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, तिथे दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. एकुलत्या एक मुलाचा असा अचानक मृत्यू झाल्याने कोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सध्या कमी वयातही हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाण वाढले असून, सोमनाथ कोरेच्या निधनामुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. त्याच्या अकाली निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.