तुळजापूर ड्रग्ज रॅकेटचं थेट मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत कनेक्शन समोर आलं आहे. तुळजाभवानी मंदिरातील पुजारीच पेडलर असल्याचं समोर आलं आहे. हा सगळा प्रकार कसा उघड झाला.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीच्या तुळजापूरला ड्रग्जचा विळखा पडला आहे. तर या ड्रग्ज रॅकेटमध्ये थेट तुळजा भवानी मंदिरातील 13 पुजाऱ्यांचा सहभाग आढळून आलं आहे. त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. तर तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 35 आरोपींची नावं समोर आलेत. त्यातील 21 जण अजूनही फरार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

एवढंच नाही तर आता थेट मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत ये-जा करणाऱ्या पुजाऱ्यांचा सहभाग आढळून आल्याने तुळजापूरात खळबळ उडालीय. मात्र पाळीकर पुजारी मंडळाने दोषींवर कारवाईचा इशारा दिलाय.
यानंतर जिल्हाधिकारी किरण कुमार पुजार यांनी देवस्थानकडे यादी मागवली आहे. मात्र तब्बल 3 वर्षापासून तुळजापूरात ड्रग्जचा गोरखधंदा सुरु असताना पोलीस प्रशासन झोपलं होतं का? तुळजापूरला बदनाम करणाऱ्या ड्रग्ज रॅकेटची कीड कुणाच्या आशीर्वादाने पोसली गेली? आणि आता पोलीस ड्रग्ज प्रकरणात तात्पुरती मलमपट्टी करणार की ड्रग्ज रॅकेटची मुळं उखडून टाकणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.