Tuljabhavani Temple 
महाराष्ट्र

Tuljabhavani Temple: तुळजाभवानी मंदिर दानपेटीतील ८ कोटीच्या अपहार प्रकरण; गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Tuljabhavani Temple: तुळजापूर येथील तुळजाभवानी संस्थानमध्ये नियमावली तयार केलेली नाही. दानपेटी कशी उघडायची, त्याचा हिशेब कसा ठेवायचा यासंबंधी कुठेच स्पष्टता नाहीये. भक्तांनी वर्ष १९९१ ते २००९ या कालावधीत दान दिले. यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

धाराशिव: तुळजाभवानी मंदिरातील दानपेटीतील अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेत. हे आदेश न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांनी दिलेत. तुळजापूर भवानी ट्रस्ट तुळजापूर येथील दानपेटीच्या सुमारे ८ कोटी ४६ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी दोन अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात यावीत. तसेच पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने तपास करण्याचे आदेश खंडपीठाने दिलेत.

तुळजापूर येथील तुळजाभवानी संस्थानमध्ये नियमावली तयार केलेली नाही. दानपेटी कशी उघडायची, त्याचा हिशेब कसा ठेवायचा यासंबंधी कुठेच स्पष्टता नाहीये. भक्तांनी वर्ष १९९१ ते २००९ या कालावधीत दान दिले. यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. अपहार झाल्याची बाब धाराशिवच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चौकशीचे निर्देश दिले होते. त्यानंतर राज्य गुन्हा अन्वेषन विभागातर्फे १७ नोव्हेंबर २०१७ चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला होता.

या आहवालात ८ कोटी ४६ लाख रूपयांचा अपहार झाल्याचे नोंद होते. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. खंडपीठात ९६/२०१५ ही जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली होती. त्यात जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना जबाबदार धरून त्याच्याविरोधात कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. पण त्यानंतर राज्यशासनातर्फे पुन्हा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न म्हणजे मंत्रालयातून एक अहवाल तयार करून घेऊन दोषींना क्लिनचिट देण्याचा प्रयत्न झालाय.

याविरोधात हिंदू जनजागृती समिती या नोंदणीकृत विश्वस्त संस्थेतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ संजय देशपांडे यांच्यावतीने खंडपीठात जनहित याचिका दाखल केली गेली. या याचिकेच्या सुनावणीनंतर खंडपीठाने २७ सप्टेंबर २०१७ आणि २१ फेब्रुवारी २०१८ च्या अहवालाच्या आधारे तुळजापूर पोलीस ठाण्यात दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

eSIM Scam: महत्त्वाची बातमी! आता फ्रॉड करणाऱ्यांना मिळणार तुमचा OTP; सरकारने दिली वॉर्निंग

Earthquake : अफगाणिस्तान भूकंपाने हादरलं! अनेकांची घरे उध्वस्त, २० जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी

Manoj jarange patil protest live updates : आजपासून पाणीही पिणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Pune Holiday: महत्त्वाची बातमी! पुण्यातील शाळा आज बंद, सरकारी कार्यालयांनाही सुट्टी

Maratha Protest : आरक्षणावर तोडगा निघणार? वर्षा बंगल्यावर फडणवीस, पवार अन् शिंदेंमध्ये आज खलबतं

SCROLL FOR NEXT