tuljabhavani darshan pass issue in tuljapur  saam tv
महाराष्ट्र

Tulja Bhavani Temple: तुळजाभवानी मंदिरात दर्शन पासचा काळाबाजार; पुजारी मंडळाचा गंभीर आराेप

तुळजापूर येथे देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची माेठी गर्दी असते.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Tuljapur News :

तुळजाभवानी मंदीरातील (tuljabhavani mandir) व्हिआयपी दर्शन पास (vip darshan pass) तसेच स्पेशल पासचा गैरप्रकार रोखण्यासाठी मंदीर संस्थानने उपाय याेजना करावी अशी मागणी पुजारी मंडळाने जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे (sachin ombase) यांना निवेदनाद्वारे केली आहे. (Maharashtra News)

जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना दिलेल्या निवेदनात पास स्कॅन करण्यासह एकुण वितरीत व्हिआयपी दर्शन व स्पेशल पास आणि स्कॅन केलेल्या पासची संख्या स्क्रिनच्या माध्यमातून प्रसिद्ध करावी अशी मागणी पुजारी मंडळाने नमूद केली आहे.

तसेच पासचे पेमेंट देखील युपीआयच्या माध्यमातून स्विकारण्याची मागणी केली आहे. मंदीर सुरक्षा रक्षकांच्या संगनमताने एकच पास अनेकदा वापरत असल्याचा आरोप देखील निवेदनातून करण्यात आला आहे. यामुळे पुजारी मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांना निवेदनाद्वारे पासबाबत पारदर्शकता आणण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT