trupti mulik 
महाराष्ट्र

नाद खूळा! महिला पोलिस कॉन्स्टेबलने केले अजित पवारांचे सारथ्य

लहानपणापासून ड्रायव्हिंगची आवड असल्याने त्या सध्या सिंधुदुर्ग मोटार पोलीस परिवहन विभागामध्ये कार्यरत आहेत.

Siddharth Latkar

सातारा : सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) हे हाेते. यावेळी त्यांच्या वाहनाचे सारथ्य पोलिस कर्मचारी तृप्ती मुळीक (trupti mulik) यांनी केले. त्यांचे वाहन चालविण्याचे कसब पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant), आमदार सतेज पाटील (satej patil) यांना काैतुक वाटले.

तृप्ती मुळीक (trupti mulik) यांनी नुकताच व्हीआयपी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला आहे. आज त्यांच्यावर उपमुख्यमंत्री पवार (ajit pawar) यांच्या वाहनाचे सारथ्य करण्याची जबाबदारी साेपविण्यात आली हाेती. ती त्यांनी सहजरित्या पार पाडली. गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस (police) विभागाच्या माध्यमातून तृप्ती या सेवा बजावत आहेत. लहानपणापासून ड्रायव्हिंगची आवड असल्याने त्या सध्या सिंधुदुर्ग (sindhudurg) मोटार पोलीस परिवहन विभागामध्ये कार्यरत आहेत.

मुळीक या कोल्हापुरातील (kolhapur) अंबप पाडळी गावाच्या असल्याने तसेच एका महिलेने नवी जबाबदारी लिलयारित्या पार पाडल्याने विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील (satej patil) यांनी तृप्ती यांचे ट्विट करुन नारी शक्ती! (women power) असे संबाेधित करुन काैतक केले आहे. पाटील लिहितात त्यांचे ड्रायव्हिंग कौशल्य वाख्याण्याजोगे असून राज्यातील तरुणींना प्रेरणा देणारे आहे. आजच्या प्रसंगामुळे माझ्या मनात माझ्या पोलीस विभागाबद्दलचा अभिमान अधिकच वाढला, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Poll Maharashtra : दापोली विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: गोदिंयामधून भाजपचे विनोद अग्रवाल होणार आमदार? पाहा Exit Poll

Mankhurd Exit Poll: अबू आझमी की नवाब मलिक, मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

Saam Exit Poll : सांगलीत भाजप मारणार बाजी? एक्झिट पोलमध्ये कौल कुणाला?

SCROLL FOR NEXT