आपआपल्या क्षेत्रात शिवरायांचा विचार रुजवा : शिवेंद्रसिंहराजे

पहिल्यांदाच ग्रामीण टेनिस क्रिकेट स्पर्धेत रिनॉन ट्रिव्हर या चारचाकी वाहनाचा बक्षीस म्हणून सहभाग करण्यात आला होता.
shivendraraje bhosale
shivendraraje bhosale
Published On

दिवा : कल्याण ग्रामीण भागातील आणि दिवा जवळील खार्डी गावात नॅशनल ब्लास्ट करंडकाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रासह देशभरातून क्रिकेटपटू सहभागी झाले होते. विजेत्यांना चारचाकी वाहनांसह दुचाकी आणि विविध बक्षिस देण्यात आले.

या स्पर्धेस आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (shivendraraje bhosale) यांनी उपस्थिती लावत खेळाडूंना शुभेच्छा देत छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांचे विचार प्रत्येकाने आपआपल्या क्षेत्रात रुजवावेत अशी भावना व्यक्त केली.

स्व. रतन बुवा स्मृती करंडक आणि गावदेवी क्रिकेट संघ खार्डी यांच्या संयुक्त विद्यमानाने नॅशनल ब्लास्ट करंडक क्रिकेट (cricket) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मनसेचे विभाग अध्यक्ष दिनेश पाटील यांनी खेळाडूंसाठी विविध वयोगटात या स्पर्धा भरवल्या होत्या. चाळीस वर्षांपुढील खेळाडू , देशभरातील तरुण खेळाडूंचे संघ , ग्रामीण विभाग, डॉक्टर्स अशा विविध विभागात हे सामने खेळविले गेले.

खार्डी संघ अव्वल

अंतिम सामन्यात सामनावीर म्हणून शिरढोण संघाच्या रुषाल म्हात्रे आणि आकाश ट्रॅकर यांचा सन्मान करण्यात आला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ४० वार्षांपुढील डॉ. उमेश पाटील यांचा सन्मान करण्यात आला आहे. तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून चाळीस वर्षांपुढील संघात केशव मुंडे,उत्कृष्ट फलंदाज म्हणून अनिल पाटील दातीवली यांचा सन्मान करण्यात आला आहे. तृतीय पारितोषिक तीस हजार रुपये आणि सन्मान चिन्ह हा दातीवली संघाला मिळाल आहे. द्वितीय पारितोषिक चाळीस हजार रुपये आणि सन्मान चिन्ह हा खांबालपाडा संघाला मिळाला आहे. प्रथम पारितोषिक साठ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह खार्डी संघाने पटकाविले. यामध्ये मालिकावीराचा मान हा संतोष साळवी यांना मिळला असून त्यांना सायकल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. 

केतन म्हात्रेस रिनॉन ट्रिव्हर

या स्पर्धेत आदर्श संघ म्हणून शिळ गावातील क्रिकेट संघ ठरला आहे. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून उंबार्ली संघाच्या प्रेम भोईर,जितू रिची इलेव्हन संघाचा स्वप्नील परमार हे ठरले आहेत. शिरढोण संघाच्या वृशाल म्हात्रे याचा उत्कृष्ठ गोलंदाज आणि दीपक दादा प्रतिष्ठान संघाच्या कृष्णा सातपुते ,घेसर संघाच्या सुरज म्हात्रे यांचा सन्मान करण्यात आला आहे. चतुर्थ पारितोषिक हा मोठागाव संघाला देण्यात आला आहे. त्यांना एक लाख रुपये आणि आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तृतीय पारितोषिक हा उंबार्ली संघाला देण्यात आली आहेत. यामध्ये एक लाख रुपये आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले आहे. द्वितीय पारितोषिक हा जितू रिची निलेश इलेव्हन डोंबिवली या संघाला दहा लाख अकरा हजार रुपयांचे बक्षीस आणि सन्मानिन्ह देण्यात आले आहे. तर घेसर संघाने ग्रामीण भागातून दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर ओपन मधून प्रथम क्रमांक हा वीस लाख बावीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन संघाला सन्मानित करण्यात आले आहे. तर ग्रामीण भागवून पहिला क्रमांक हा शिरढोण संघाने पटकावला आहे. या संघाला तीन लाख रुपये आणि आकर्षक सन्मानचिन्ह देऊन संघाला गौरवण्यात आले आहे. तर पहिल्यांदाच ग्रामीण टेनिस क्रिकेट स्पर्धेत रिनॉन ट्रिव्हर या चारचाकी वाहनाचा बक्षीस म्हणून सहभाग करण्यात आला होता. हि कार चार सामन्यात १२६ रन काढणाऱ्या जे. एस. अभिजीत पानसे संघाच्या केतन म्हात्रे यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तरं मालिका वीर म्हणून निलेश म्हात्रे मोठागाव यांचा सन्मान करण्यात आला आहे.

shivendraraje bhosale
लाज कशाची वाटती सांगून टाका; शिवेंद्रराजेंचे उदयनराजेंना आवाहन

यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ,कल्याण ग्रामीण विधानसभेचे माजी आमदार रमेश पाटील, आमदार राजू पाटील, ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील, मनसेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, शहर सचिव अरुण जांभळे, शहर संघटक योगेश पाटील ,उप विभाग अध्यक्ष शरद पाटील उपस्थित होते.       

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com