वाहनाचा अचानक दरवाजा उघडणं एका दुचाकीस्वाराच्या जीवावर बेतलं आहे. वाशिमच्या रिसोड शहरातील वाशिम-लोणार महामार्गावर एक अपघात झाला असून यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सुनील धुत असं मृत दुचाकीस्वाराचं नाव आहे. (Latest News)
अपघाताविषयी मिळालेल्या माहितीनुसार, सुनील धुत हे बँकेचे काम करण्यासाठी जात होते. त्यावेळी रिसोड शहरातील डॉ. जितेंद्र गवळी यांच्या हॉस्पिटलजवळ एका वाहन उभे होते. त्या वाहनातील एका व्यक्तीने मागून येणाऱ्या दुचाकीकडे लक्ष न देता वाहनाचा दरवाजा अचानकपणे उघडला. या दरवाजाचा फटका दुचाकीस्वार सुनील यांना लागला. दरवाजाच्या फटका लागल्याने ते दुचाकीच्या खाली फेकल्या गेले. त्यावेळी मागून येणाऱ्या एका सिमेंट वाहनाऱ्या ट्रकने त्यांना चिरडलं. यात त्यांच्या जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
वाहनातून खाली उतरत असताना येणाऱ्या-जाणाऱ्या वाहने पाहावीत. जेणेकरून अशा प्रकारच्या दुर्घटना होणार नाहीत. रस्ता ओलांडताना आणि वाहनातून उतरताना दोन्ही बाजूकडील वाहनांवर लक्ष द्यावं अशा सुचना आपण नेहमी सांगत असतो. त्यामुळे प्रवास करताना आपली घाईमुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
नांदेडमध्ये भीषण अपघात
बुधवारी रात्री नांदेडमधून असाच भीषण अपघात दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. या घटनेत स्कूटीवरून जाणाऱ्या दोन तरूणांचा मृत्यू झालाय.हा अपघात रात्री साडे अकराच्या दरम्यान अर्धापूर- नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील श्रीसंत किसन बापू आश्रमाजवळ घडला होता. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीने पार्डीकडून अर्धापुरकडे येत होते. श्रीसंत किशनबापू आश्रमाजवळ येताच मागून भरधाव येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.