dharashiv  Saam tv
महाराष्ट्र

Shocking : ऑनलाइन जुगारामुळे कर्जबाजारी झाला, २ वर्षांच्या मुलासह बायकोला विष दिलं, मग स्वत: टोकाचे पाऊल उचललं

Dharashiv Shocking : धाराशिवात ऑनलाइन जुगारामुळे कर्जबाजारी झालेल्या तरुणाने मुलगा आणि बायकोला संपवलं. त्यानंतर या तरुणाने आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे.

Vishal Gangurde

बालाजी सुरवसे, साम टीव्ही

धाराशिव : नवी मुंबईतील २२ वर्षीय तरुणीने आर्थिक अडचणीला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवऱ्याने बायको आणि २ वर्षांच्या मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. धाराशिवात बावीमध्ये ही घटना घडली आहे. धाराशिवमधील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवमधील बावी येथे पत्नीसह दोन वर्षांच्या मुलाची हत्या करून ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ऑनलाइन जुगारात सर्व गमावलं. त्यानंतर कर्जाबाजारीपणातून तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. तरुणाच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. लक्ष्मण मारुती जाधव असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?

तीन वर्षांपूर्वी लक्ष्मण आणि तेजस्विनीने प्रेम विवाह केला होता. शिवांश असे त्यांच्या दोन वर्षीय चिमुकल्यांचे नाव होतं. ऑनलाइन जुगारामुळे लक्ष्मण आर्थिक अडचणीला सामोरे जात होता. हातात पैसे नसल्याने लक्ष्मण कर्जबाजारी झाल्याचं बोललं जात आहे. कर्जबाजारी झाल्यामुळे लक्ष्मण नैराश्यात गेला होता. नैराश्यात गेलेल्या लक्ष्मणने रविवारी रात्री पत्नी आणि लहान मुलाला विष देऊन त्यांना मारलं. त्यानंतर लक्ष्णनने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावी गावातील सरपंचाने फोन करून घटनेविषयी माहिती दिली की, लक्ष्मण हे घराच्या बाहेर येत नाहीये. त्यामुळे आम्ही लक्ष्मणच्या घराजवळ पोहोचलो. त्यानंतर घराचा पत्रा कापला. त्यानंतर घरात तिघे मृतअवस्थेत सापडले. आम्ही पंचनामा केला आहे. मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवली आहे. पोस्टमार्टमनंतर सर्व बाबी स्पष्ट होतील. त्याने ऑनलाइन जुगार आणि शेअर बाजारात पैसे गुंतवले होते. त्याने त्याची शेती आणि राहते घर विकलं होतं, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

Tanushree Dutta: 'फार्महाऊसवर न येता, तू हिरोईन...'; तनुश्री दत्ताने बॉलिवूडवर पुन्हा केले गंभीर आरोप

मुसळधार पावसानं पुण्यात दाणादाण, वाहनं अडकली, ट्रॅफिकला ब्रेक; थरकाप उडवणारी दृश्ये, VIDEO

Tallest Actor: बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांच्याही पेक्षा उंच अभिनेता कोण?

Friday Horoscope : प्रेमाचा वर्षाव होईल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्याला कलाटणी मिळणार

SCROLL FOR NEXT