Trimbakeshwar News Saam tv
महाराष्ट्र

Trimbakeshwar Temple News: त्र्यंबकेश्वरच्या वादात आता आखाड्याची उडी, सत्य शोधण्यासाठी समितीची स्थापना

Latest News: येत्या 1 जूनपर्यंत ही समिती आपला निर्णय देणार आहे.

Priya More

Nashik News: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) मंदिरात अन्य धर्माच्या जमावाकडून बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. या प्रकरणात आता आखाड्याने उडी घेतली आहे. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar Temple) वादामागील सत्य शोधण्यासाठी आखाडा परिषदेने समितीची स्थापना केली आहे. येत्या 1 जूनपर्यंत ही समिती आपला निर्णय देणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जमावाने बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणावरुन आखाडा आक्रमक झाला आहे. त्र्यंबकेश्वर वादामागील सत्य शोधण्यासाठी आखाडा परिषदेने समितीची स्थापना केली आहे. त्र्यंबकेश्वरच्या वेगवेगळ्या आखाड्यातील 12 साधू आणि महंतांची ही समिती असणार आहे. धूप दाखवण्याची परंपरा होती की नव्हती? त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न खरच झाला होता का? यामागील सत्य ही समिती शोधून काढणार आहे.

तसंच, त्र्यंबकेश्वर प्रकरणातील नेमकं सत्य ही 12 जणांची समिती शोधणार असून येत्या 1 जूनला समिती आपला निर्णय देणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवण्याची परंपरा नसल्याचे तसंच बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याचे सिद्ध झाल्यास आखाडा परिषद कठोर निर्णय घेणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.

दरम्यान, त्र्यंबकेश्वरच्या वादानंतर साधू-मंहत देखील आक्रमक झाले आहेत. मस्जिदमध्ये हनुमान चालीसा पठणास परवानगी द्या, अशी मागणी महंत अनिकेतशास्त्री महाराज यांनी केली आहे. मागणी मान्य नसेल तर ही नौटंकी बंद करा, असे त्यांनी सांगितले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांविरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी देखील सुरू करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who Is Mahika Sharma: हार्दिक पांड्यामुळे चर्चेत आलेली माहिका शर्मा कोण आहे?

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशाहाची जगभरात क्रेझ; किंग खानला मिळाला हा मोठा किताब

Pune: दारू पिऊन भररस्त्यात धिंगाणा, कोर्टाकडून आरोपींना अजब शिक्षा; तुरुंगात न पाठवता थेट...

Christmas Tourism: ख्रिसमसला 2 दिवसाची ट्रीप करा प्लान, भारतातल्या 'या' Top 7 ठिकाणांची नावे पाहाच

Mumbai : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील ३ दिवस 'या' भागात राहणार पाणी बंद; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT