Nashik Water Supply News: नाशिककरांनाे ! 'या' दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद; जाणून घ्या कारण

Nashik Water Cut News: अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Nashik, Water Supply
Nashik, Water Supplysaam tv

Nashik News : नाशिक शहरात येत्या शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद (nashik water supply) राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. (Maharashtra News)

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुकणे धरणाच्या पंपिंग स्टेशनवरील सब स्टेशनच्या विद्युत कामासाठी शनिवारी वीज पुरवठा बंद राहणार आहे. वीज पुरवठा बंद राहणार असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम हाेण्याची शक्यता असते. त्यामुळे शनिवारी पाणीपूरवठा बंद (water supply) ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

Nashik, Water Supply
ICSE Board 10th Result 2023 : डोंबिवलीच्या रुद्र मुकादम देशात दुसरा, शिक्षकांनी सांगितलं यशाचे गमक

दरम्यान गंगापूर धरणाच्या पंपिंग स्टेशनवरून पाणी पुरवठा होणाऱ्या जलशुध्दीकरण केंद्र, जलकुंभ आणि वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीच्या कामासाठी देखील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे पालिकेने कळविले आहे. शनिवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार असून रविवारी सकाळीही कमी दाबाने पाणीपुरवठा हाेईल असे पालिकेने म्हटलं आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Nashik, Water Supply
बेधुंद तू बेछूट मी... 36 Nakhrewali.., पत्रकारांना मारहाण करणारे पाच जण पाेलीसांच्या ताब्यात, Gautami Patil कार्यक्रमाचे आयाेजकही अडचणीत (पाहा व्हिडिओ)

दरम्यान, अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबण्याची शक्यता असल्याने एप्रिल आणि मे महिन्यात आठवड्यातून एक दिवस गरज पडल्यास जून आणि जुलै महिन्यात आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे पाठवलाय.

यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसतांना दुसरीकडे महावितरणमुळे शहरात शनिवारी पाण्याचा ड्राय डे ठेवण्याची वेळ आलीय.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com