बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. २ नोव्हेंबरपासून त्र्यंबकेश्वराचं २०० रुपयात पेड दर्शन सुरू होत आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ऑनलाइन पेड दर्शनाचा शुभारंभ पार पडणार आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या मार्फत दररोज ४ हजार भाविकांना ऑनलाईन पेड दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. मंदिराच्या उत्तर दरवाजातून भाविकांना प्रवेश मिळेल. मंदिर उघडल्यानंतर पहाटे साडे पाच वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत सुरू पेड दर्शनाची सुविधा सुरू राहणार आहे. तर दिव्यांगांसाठी मोफत दर्शनाची सुविधा देखील देण्यात आली आहे.
यामुळे भाविकांना फोनद्वारे हव्या त्या तारखेचं पेड दर्शन बुक करता येणार आहे. अनेक व्यक्तींच्या मागे कामाचा बराच व्याप असतो. मात्र मनात खरी भक्ती असते. भक्तीभावे देवाची सेवा करता यावी ज्योतिर्लिंगांचं दर्शन घ्यावं असं अनेकांना वाटतं. काही भाविक आजारी असतात, किंवा वयोवृद्ध झाल्याने त्यांना येथे पोहचणे कठीण होतं. त्यामुळे अशा भक्तांसाठी ऑनलाईन पेड दर्शन फायद्याचं ठरणार आहे.
त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी नाशिक गाठावं लागेल. नाशिकपासून २८ कि.मी. अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर आहे. तर मुंबईपासून १६५ कि.मी.अंतरावर आहे. मुंबईहून तुम्ही कसारा घाटातून इगतपूरी मार्गे तसेच भिवंडी वाडा मार्गे खोडाळ्यावरून पुढे जाऊ शकता. शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या नांवाने प्रसिद्ध आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.