trimbakeshwar news Saam tv
महाराष्ट्र

Video : त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांच्या श्रद्धेशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार; अखेर 'त्या' व्हिडिओमागील सत्य आलं समोर

नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये चक्क भाविकांच्या श्रद्धेशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik Crime News : नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये चक्क भाविकांच्या श्रद्धेशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवर बर्फ तयार झाल्याचा खोटा दावा करून पुजाऱ्यांकडूनच भाविकांच्या श्रद्धेची फसवणूक करण्यात आली आहे. आता याप्रकरणी एका पुजाऱ्यासह त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

त्र्यंबकेश्वराच्या मंदिरातील शिवपिंडीवर बर्फ तयार झाल्याचा हा व्हिडिओ वर्षभरापूर्वी मंदिरातीलच पुजाऱ्यांनी सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात बाबा अमरनाथ प्रकटल्याचा दावाही करण्यात आला होता. मात्र मंदिरातीलच एका पुजाऱ्याने आपल्या दोन साथीदारांच्या साहाय्याने बाहेरून पिशवीतून बर्फ आणून शिवपिंडीवर ठेवल्याचं आता समोर आलं आहे.

शिवपिंडीवरील बर्फाचं हे सत्य समोर आल्याने चक्क पुजाऱ्यांनी भाविकांची फसवणूक केल्याचे उघड झालंय. हा सर्व प्रकार आता उघड झाल्यानंतर याप्रकरणी त्र्यंबकेश्वर देवस्थानाबाबत खोटा प्रचार केल्याच्या विरोधात सुशांत तुंगार आणि त्याला मदत करणारे आकाश तुंगार आणि उल्हास तुंगार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात आता अनिस ने देखील उडी घेतली असून पिंडीवर बर्फ साचल्याचा बनाव करून भाविकांच्या श्रद्धेशी खेळ केल्याबद्दल दोषींवर कारवाई व्हावी. शिवाय या गुन्ह्यात जादूटोणाविरोधी कायद्याचं कलम लावण्याची मागणी अंनिसकडून करण्यात आली आहे

22 जून 2022 साली त्र्यंबकेश्वराच्या शिवलिंगावर बर्फ तयार झाल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडालेली होती. देशाच्या उत्तरेत मोठा संकट आल्यानंतर त्र्यंबकेश्वराच्या (Trimbakeshwar) पिंडीवर अशा पद्धतीने बर्फ तयार होत असल्याचा दावा देखील करण्यात आला होता. त्यानंतर देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने हवामान खात्याचा निर्वाळा घेऊन सत्य परिस्थितीदेखील पडताळून पाहिल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले होते.

मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासणी करण्यात आली आणि यामध्ये संबंधित पुजाऱ्याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने पिशवीत बर्फ आणून त्या ठिकाणी ठेवल्याचं उघड झालं आणि पुजाऱ्यांच्या बनावाचं बिंग फुटलं. त्यामुळे भाविकांच्या सदस्य खेळणाऱ्या विरोधात कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आपल्या मागण्यासाठी महिलांनी सिंचन भवन येथील संबंधित अधिकाऱ्याच्या टेबलवर फोडल्या बांगड्या

Sindhudurg Fort : सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यावरील छुपा किल्ला; इतिहासात दडली आहेत रहस्ये, अनुभवाल नजरेत भरणारे सौंदर्य

Stye Eye Care : डोळ्याला रांजणवाडी येण्याआधी दिसतात 'ही' ६ लक्षणे, वेळीच जाणून घ्या नाहीतर...

Good News: ST प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, घरबसल्या NCMC कार्ड रिचार्ज करता येणार; कसं ते वाचा...

Shiv Sena Symbol Hearing: दोन्ही शिवसेनेने बाळासाहेबांच्या नव्हे, तर स्वतःच्या बळावर लढावे; सुप्रीम कोर्ट

SCROLL FOR NEXT