Tree Plantation in Latur
Tree Plantation in Latur saam tv
महाराष्ट्र

कौतुक करावं तितकं कमी, मांजरा नदीकाठावर हिरवा शालू पांघरला, चौदा गावात केली वृक्ष लागवड

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे. वृक्ष लागावडीसाठी (Tree Plantation) जास्तीत जास्त नागरिक सहभागी होत आहेत. याचं श्रेय नागरिकांचेच आहे. लोकांनी या गोष्टीला स्वीकारले आहे. लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवड करणे अनिवार्य असणार आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. (Prithviraj B. P) यांनी नागरिकांना केले आहे. जिल्हा प्रशासनाकडून व नागरिकांच्या सहभागातून मांजरा नदीकाठावर (Manjara Riverside) दहा किलोमीटरपर्यंत वृक्ष लागवड करण्यात आली. भातखेड येथे वृक्ष लागवडीचे उद्घाटन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल (Abhinav Goyal) यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,मा.आ.पाशा पटेल,उपविभागीय अधिकारी सुनिल यादव, तहसीलदार स्वप्निल पवार,शिक्षण विस्तार अधिकारी जाधव निवृत्ती,गट शिक्षण अधिकारी संजय पंचगले,माजी सरपंच शांताबाई मुळे, उपसरपंच विकास बेद्रे,ग्रामसेवक खंडु कलबोने,तलाठी वांगवाड, केंद्रप्रमुख हुसेन शेख,जिल्हापरिषद शाळेचे मुख्याध्यापक संदीप भोसले आदिंची उपस्थिती होती.

Tree plantation

प्राथमिक शाळा कासारखेडा,चिकलठाणा,बामणी,प्रशाला भातांगळी,श्रीराम विद्यालय कासारखेडा,जय भवानी विद्यालय बामणी,मातृभूमी विद्यालय भातांगळी या शाळेतील सर्व शिक्षक भातांगळी येथे तसेच प्रा.शा.खुलगापूर,मळवटी,कासारगाव,कोळपा, हनमंतवाडी,सकपाळ नगर,भातखेडा,छत्रपती शिवाजी विद्यालय मळवटी,राजमाता सुशीला देवी विद्यालय महाराणा प्रताप नगर या शाळेतील सर्व शिक्षक भातखेडा यांचा सहभाग होता.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.म्हणाले, देशात लातूर जिल्हा कमी पर्जन्यमान असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशातच नव्हे, तर राज्यात लातूरचे 0.6 टक्के वनाच्छादित आहे.वनाचं क्षेत्र सरासरी 33 टक्के इतके असणे आवश्यक आहे.लातूरचा इतिहास असा आहे की,लातूर जिल्हा हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.जिल्हा प्रशासन,नागरिक,संस्था,ग्रामपंचायत तसेच शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने याही वर्षी लागवड करण्यात येत आहे.वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज समजून याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. वृक्ष लागवडीची प्रक्रिया जबाबदारी समजून सुरु ठेवावी लागणार आहे.जिल्ह्यातील नागरिकही याबाबतीमध्ये जागरुक आहेत.या वृक्ष लागवडीसाठी नागरिकांतून सहभाग प्रोत्साहन मिळत आहे,ही छोटी चळवळ असून अविरतपणे सुरु ठेवणार आहोत.

जेथे झाडे रुजवली जातात,तिथे झाडे जगवली जातात,वाढती पर्जन्यवृष्टी, वृक्षांनी सजवा सृष्टी,झाडे लावा,झाडे जगवा या घोषवाक्याने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध शाळा,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घोषणा देत वृक्षदिंडी काढली. लातूर तालुक्यातील भटखेडा,सोनवती,धनेगाव,शिवणी खुर्द, भातांगळी, भाडगाव, रमजानपूर, उमरगा, बोकनगाव, सलगरा,बिंदगीहाळ तर औसा तालुक्यातील शिवणी,तोंडवळी, होळी या चौदा गावात वृक्ष लागवड करण्यात आली.

राजर्षी शाहू महाविद्यालय,दयानंद कला, वाणिज्य,विज्ञान आणि विधी महाविद्यालय,महात्मा बसवेश्वर महाविद्यालय,विवेकानंद महाविद्यालय,त्रिपुरा महाविद्यालय,श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय,चन्ना बसवेश्वर महाविद्यालय,कै.वेंकराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव, जायक्रांती महाविद्यालय लातूर, केशवराज विद्यालय, देशीकेंद्र विद्यालय,कमाला नेहरू विद्यालय,बोरी,शिवाजी महाविद्यालय,शिवणी,राजर्षी शाहू विद्यालय,बोरी यांनी वृक्षलगवडीत सहभाग घेतला.ग्रीन लातूर वृक्ष टीम,आर्ट ऑफ लिव्हिंग,आधार फाऊंडेशन,लातूर वृक्ष चळवळ,आम्ही मावळे शिवबाचे,रोटरी मिडटाऊन,लातूर सायकलिस्ट क्लब,वसुंधरा प्रतिष्ठान या विविध संस्थानी उत्स्फूर्त सहभाग घेवून इतरांनाही प्रेरीत केले.

वक्ष लागवड अशाप्रकारे करण्यात आली

लातूर तालुक्यातील भातखेडा येथे 2 हजार रोपे,सोनवती येथे 2000,धनेगाव येथे 4000, शिवणी खुर्द येथे 550 रोपे,भातांगळी येथे 3500,भाडगाव येथे 1 हजार,रमजानपूर येथे 1500, उमरगा येथे 2000, बोकनगाव येथे 2300, सलगरा 4100, बिंदगीहाळ 500, औसा तालुक्यातील शिवणी 3000, तोंडवळी येथे 2000, होळी येथे 2000 अशी वृक्ष लागवड करण्यात आली.

भातगडा येथे सुरुवात करून भांतगळी फाटा,रमजानपूर,उमरगा,धनेगाव,सलगरा,बोकनगाव त्यानंतर बिंदगीहाळ या गावात जाऊन वृक्ष लागवड करण्यात आली.विद्यार्थी,शिक्षक आणि विविध स्वयंसेवी संस्था,त्या त्या गावचे नागरिकांना भेटून अत्यंत महत्वाच्या कार्यात सहभाग घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही आलो आहोत, इथून पुढेही प्रशासनाचे या कामावर लक्ष राहील, असं अश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिले आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai crime : उरणमधील महिलेच्या हत्येचा उलगडा; पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली समोर

Grah Gochar: १ मे पासून 'या' राशींचं पलटणार नशीब; मेषमधील सूर्य-शुक्राच्या युतीमुळे मिटतील अडचणी

Buldhana News: डीजेच्या दणदणाटामुळे मधमाशा चवताळल्या; वऱ्हाडी मंडळींवर चढवला हल्ला, लोक पळतच सुटले

Vegetables Rate Increased In APMC: उष्णता वाढल्यामुळे आवक घटली; भाजीपाला महागला, काय आहेत आजचे दर?

Jalana News: हृदयद्रावक! बोअरवेल सुरू करताना विद्युत केबलने पेट घेतला.. महिलेचा होरपळून मृत्यू; जालना हळहळलं

SCROLL FOR NEXT