Satara , Sayaji Shinde, Tree Plantation saam tv
महाराष्ट्र

किती पक्ष,किती काेलांटउड्या, किती भांडण, सत्तेसाठी काहीही.., अभिनेते सयाजी शिंदे (व्हिडिओ पाहा)

आज अभिनेते सयाजी शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात पाच हजार वृक्षांच्या राेपण करण्यासाठीच्या कार्यक्रमास उपस्थिती लावली.

ओंकार कदम

सातारा : जगात फक्त झाडंच सेलीब्रेटी असतं कारण ते कोणावरही कधी अन्याय करत नाही. झाडं न मागता आपल्याला अनमोल असं ऑक्सिजन तर देतच मात्र पृथ्वी तलावरच्या प्रत्येक गरजुला सावली देण्याचं काम देखील झाड (tree) करतं. यामुळे झाडं लावुन जगवली पाहिजेत अशी भावना अभिनेते सयाजी शिंदे (sayaji shinde) यांनी सातारा (Satara) जिल्ह्यात व्यक्त केली. (Sayaji Shinde Latest Marathi News)

कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथे एका शाळेच्या माध्यमातुन सुमारे पाच हजार झाडं लावण्याचा उपक्रम करण्यात आला. आज त्यानिमित्त गावातुन वृक्ष दिंडी काढुन झाडं लावा झाडं‌ जगवा हा संदेश देण्यात आला. या दिंडीत अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह आयाेजक विजय बराटे तसेच शालेय विद्यार्थी सहभागी झाले हाेते.

यावेळी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात वृक्षा राेपण करण्यात आले. अभिनेते शिंदे म्हणाले येऊन येऊन येणार काेण झाडाशिवाय आहेच काेण. किती पक्ष,किती काेलांटउड्या, किती भांडण सत्तेसाठी काहीही पण टिकलं ते झाडंच. येत्या स्वातंत्र्यदिनी राज्यातील सरपंचांनी झाडं लावण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन अभिनेते शिंदे यांनी केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT