गुरुवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तृतीय पंथीयांचा आत्महत्येचा प्रयत्न डॉ. माधव सावरगावे
महाराष्ट्र

गुरुवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तृतीय पंथीयांचा आत्महत्येचा प्रयत्न

नेहमी त्रास देणाऱ्या गुरुवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी एका तृतीयपंथी यांनी अंगावर रॉकेल ओतुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : नेहमी त्रास देणाऱ्या गुरुवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी एका तृतीयपंथी (Transgender) यांनी अंगावर रॉकेल ओतुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना औरंगाबाद (Aurangabad) शहरातील महिला तक्रार निवारण केंद्रात घडली आहे. रॉकेल अंगावर घेणाऱ्या तृतीयपंथियाला दामिनी पथकाच्या पोलिसांनी (police) संबंधितांना ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. (Transgender self slaughter attempt to demand action on Guru)

हे देखील पहा-

औरंगाबाद शहरातील (City) महिला तक्रार निवारण केंद्रांमध्ये गुरुकडून मानसिक त्रास होत असल्याची तक्रार देण्यासाठी १० ते १५ तृतीयपंथीय आले होते. त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली होती. ठिय्या देत असतानाच एका तृतीय पंथीयानी अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. महिला पोलिसांनी तात्काळ तृतीय पंथीयास अडविण्यात आले.

तेव्हा त्यांनी त्रास देणाऱ्या गुरुवर कारवाई करा, अन्यथा आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या, अशी त्यांची मागणी होती. या आंदोलनात भरोसा सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण पाटील यांच्यासह उस्मानपुराच्या निरीक्षक गिता बागवडे यांनी मध्यस्थी करीत आंदोलकांची समजूत काढण्यात आली. तसेच संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी माघार घेतली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

High cholesterol: फक्त आहारात या 5 पदार्थांचा करा समावेश; रक्तावाहिन्यांमध्ये साचलेली चरबी लगेच निघून जाईल

भाजप नेत्याचा 'हायटेक' कारनामा, एमटीएनएलच्या २० लाखांच्या केबलवर डल्ला; १३ जण गजाआड

Maharashtra Fort : कुछ तुफानी करते है! 'हा' किल्ला चढताना काळजाचा ठोका चुकतो, २,२५० फूट उंचीवरचा थरारक ट्रेक

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी खुशखबर, कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT