Emergency services at the site of a tragic truck-bike collision where a young child was seriously injured. Saam tv
महाराष्ट्र

भीषण अपघातात आई-वडिलांचा जागीच मृत्यू, 6 वर्षाच्या मुलीचे छत्र हरपले; मन हेलावून टाकणारी घटना

Heartbreaking Crash Kills Couple Leaves 6-Year-Old Girl Injured: चंद्रपूर-गोंडपिपरी मार्गावर भीषण अपघात झाला. पती-पत्नी जागीच मृत्यूमुखी पडले, तर ६ वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

Omkar Sonawane

गणेश शिंगाडे, साम टीव्ही

चंद्रपूर-गोंडपिपरी मार्गावर सोमवारी सायंकाळी एक अतिशय हृदयद्रावक घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांची सहा वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे अनखोडा परिसरात शोककळा पसरली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील अनखोडा येथील रहिवासी गौतम सुरेश निमसरकर (३५) हे आपली पत्नी वैशाली (३२) आणि मुलगी सिया (६) यांच्यासह दुचाकीने प्रवास करत होते. सोमवारी, ६ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास धानापूर गावाजवळ समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, गौतम निमसरकर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सुरजागड पेट्रोलिंग पथक आणि गोंडपिपरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली.

गंभीर जखमी झालेल्या वैशाली आणि चिमुरड्या सियाला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान वैशाली निमसरकर यांचीही प्राणज्योत मालवली. सहा वर्षांची सिया सध्या गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका भीषण अपघातात आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या या चिमुरडीच्या परिस्थितीमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Death : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Maharashtra News Live Update: अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करा ,क्लस्टर योजना तातडीने राबवा; कल्याणमध्ये आंदोलकांची मागणी

Gold Mangalsutra Designs: सोन्याच्या मंगळसूत्राचे लेटेस्ट 5 डिझाईन्स, गळ्यात दिसतील शोभून

Thane Water supply : ऐन उन्हाळ्यात ठाण्यात पाणीबाणी; 24 तास पाणीपुरवठा राहणार बंद, कधी आणि कोणत्या भागात?

New Labour Law: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता एप्रिलचा पगार येणार कमी; मार्चपेक्षा जास्त पैसे कापले जाणार; कारण काय?

SCROLL FOR NEXT