Navratri celebration turns tragic: Woman collapses during Garba-Dandiya — safety precautions advised for dancers. Saam Tv
महाराष्ट्र

दांडिया खेळताय, सावधान ! गरबा-दांडिया खेळताना येतो हार्टअटॅक?

Garba and Heart Risks: सध्या सगळीकडे नवरात्रौत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. सारेच जण दांडियाचा आनंद घेताना पाहायला मिळतायेत. मात्र दांडिया खेळता खेळता तुमचा जीवही जाऊ शकतो. हे आम्ही अशासाठी म्हणतोय कारण दांडिया खेळताना एका 35 वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागलाय.

Omkar Sonawane

सध्या राज्यात सगळीकडेच नवरत्रतौत्सवाची धूम सुरू आहे. तरूणाईचा उत्साह तर ओसंडून वाहतोय. पण जरा थांबा, हाच दांडिया तुमच्या जिवावर उठू शकतो...होय दांडिया खेळताना सावध राहा, दांडियामुळे तुम्हाला हार्टअटॅक म्हणजेच हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या लासूर स्टेशन इथं एका महिलेचा दांडिया खेळताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं जागीच मृत्यू झालाय. नंदिनी अंबादास पवार असं या 35 वर्षीय महिलेचं नाव आहे. गरबा खेळताना नंदिनीचा मृत्यू झाल्यानं सर्वांनाच धक्का बसलाय.

तज्ज्ञांच्या मतानुसार गरबा हा फक्त नृत्याचा प्रकार नाही तर तो एक प्रकारचा वेगानं केला जाणारा व्यायाम आहे. अचानक झालेल्या शारीरिक हालचाली, अपुरी झोप, उपवासामुळे शरीरावर आलेला ताण, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि पाण्याची कमतरता यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. विशेषतः ज्यांच्या हृदयात आधीपासून ब्लॉकेज आहेत किंवा ज्यांना हृदयरोगाचा धोका आहे, त्यांच्यासाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते.

तुम्हाला हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास तपासणी करून घ्या..आवश्यकता वाटत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. उपाशीपोटी गरबा खेळू नका. उपवासानंतर लगेच जोरदार नृत्य केल्यानं शरीर कमकुवत होतं आणि हृदयावर ताण वाढतो. त्यामुळे हलका आणि पौष्टिक आहार घ्या. गरबा किंवा दांडिया खेळताना घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे वेळोवेळी पाणी प्या. उत्साहाच्या भरात खूपवेळ दांडिया खेळू नका. थकवा जाणवल्यास ताबडतोब विश्रांती घ्या.

दांडिया हे आनंदाचं प्रतीक आहेत. मात्र हा आनंद साजरा करत असताना अतिरेक होणार नाही याची दक्षता घ्या. उत्साहाच्या भरात शरीराला दमवून आपला जीव धोक्यात घालू नका. नाहीतर तुम्हालाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो

हृदयाशी संबंधित समस्या असल्यास तपासणी करून घ्या

आवश्यकता वाटत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

उपाशीपोटी गरबा खेळू नका

उपवासानंतर नृत्य केल्यानं शरीर कमकुवत होतं, हृदयावर ताण

हलका आणि पौष्टिक आहार घ्या

दांडिया खेळताना घामामुळे शरीरातील पाण्याच्या पातळीत घट

डिहायड्रेशन टाळण्यासाठी वेळोवेळी पाणी प्या

उत्साहाच्या भरात खूप वेळ दांडिया खेळू नका

थकवा जाणवल्यास ताबडतोब विश्रांती घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tamil Nadu Stampede: विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशामुळे झाली? नेत्यांमुळे की पाण्याच्या बाटल्या वाटपामुळे? मुख्य कारण काय

Vijay Thalapathy Rally: बत्ती गूल होताच घडली चेंगराचेंगरी, ३१ जणांचा मृत्यू ; अभिनेत्याच्या सभेत धडकी भरवणारी गर्दी, Video Viral

Voter ID Scam in South Mumbai: मुंबईच्या सोसायटीमध्येही व्होटचोरी? राहणार फुटपाथवर, पत्ता सोसायटीचा

'PM केअर फंडातून कर्जमाफी द्या' शेतकरी कर्जमाफीवरुन ठाकरेंनी घेरलं

Shocking : नणंद देखण्या वहिनीच्या प्रेमात, घर सोडून दोघी पळाल्या; WhatsApp चॅट्समुळे सत्य आलं समोर

SCROLL FOR NEXT