Ahilyanagar News Saam Tv
महाराष्ट्र

Leopard Attack : धक्कदायक! अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला, जबड्यात पकडलं अन्...

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये बिबट्याने अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीवर हल्ला करून तिला उचलून नेल्याची घटना घडली आहे. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे गावात भीतीचं वातावरण असून वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

Alisha Khedekar

अहिल्यानगरमध्ये बिबट्याने पाच वर्षीय चिमुकलीला उचलून नेलं

गावात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे

गेल्या दोन महिन्यांपासून या भागात बिबट्यांचा वावर आहे

नागरिकांकडून बिबट्याला तातडीने पकडण्याची मागणी

अहिल्यानगरमध्ये अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. रात्री घराच्या अंगणात खेळताना एका चिमुकलीवर शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. धक्कदायक म्हणजे अंधाराचा फायदा घेत बिबट्याने चिमुकलीला घेऊन धूम ठोकली. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

काही दिवसांपूर्वी एका गावात घराच्या अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटना ताज्या असतानाच अहिल्यानगरमधील खारे कर्जुने येथे रियांका पवार पाच वर्षीय चिमुकली रात्री घराच्या अंगणात खेळत होती. घराजवळ असलेल्या तुरीच्या शेतात एक बिबट्या दबा धरून बसला होता. संधी साधून हा बिबट्या दबक्या पावलाने पवार यांच्या अंगणात गेला आणि रियांकावर हल्ला केला.

कुटुंबीयांनी हा प्रकार बघताच आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत बिबट्याने रियांकाला आपले भक्ष बनवून शेतात ओढत नेले. पवार कुटुंबीयांनी त्याचा पाठलागही केला मात्र एखाद्या चोराप्रमाणे अंधाराचा फायदा घेत या बिबट्याने पळ काढला असल्याची माहिती चिमुकलीचे आजोबा रोहिदास गायकवाड आणि तिची आई ताई पवार यांनी दिली आहे. या घटनेमुळे या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून पोटच्या मुलीला उचलून नेल्यामुळे आईने हंबरडा फोडला आहे. या बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून या भागात बिबट्यांचा वावर असून वन विभागाला वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या परिसरात जवळपास चार ते पाच बिबट्यांचा वावर असून याची कल्पना वन विभागाला दिली होती. मात्र वनविभागाने इतर ठिकाणी बंद पिंजरे लावले असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. गेल्या बारा तासापासून या परिसरात रियांकाचा शोध सुरू असून अद्यापही चिमुकलीचा शोध लागलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Vastu Shastra: संध्याकाळी 'या' वेळेत घरात प्रवेश करते देवी लक्ष्मी; ही खास कामं जरूर करा

Maharashtra Politics: NCP च्या स्टार प्रचारकांच्या यादीत छगन भुजबळांना स्थान नाही, धनंजय मुंडेंचे नाव ५ व्या क्रमांकावर

Lagnanantar Hoilach Prem : पार्थ पुन्हा काव्याच्या गळ्यात घालणार मंगळसूत्र; डिझाइनही आहे खूप खास, पाहा VIDEO

Biryani Recipe: बासमती तांदळाची व्हेज बिरयानी कशी बनवायची? वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT