Sangli News Today साम टीव्ही
महाराष्ट्र

सांगली हादरली! आधी एकजण खाली उतरला, त्याला वाचवण्यासाठी दुसरा गेला, अन् पाहता पाहता तिघांचाही मृत्यू; नेमकं काय घडलं?

Sangli News Today : सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोणमध्ये हृदयद्रावक घटना घडली. हॉटेलमागील शौचालयाचा शोष खड्डा साफ करताना तुषार कोष्टी, अक्षय बागडे आणि यशवंत शेळके या तिघा कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

विजय पाटील, सांगली प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथे शौचालयाच्या शोषखड्ड्याची सफाई करताना गुदमरून तिन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. तुषार कोष्टी, अक्षय बागडे आणि यशवंत शेळके अशी मृत कामगारांची नावं आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शिरढोण येथील एका हॉटेलच्या मागे असलेल्या शौचालयाचा शोषखड्डा साफ करण्यासाठी एकूण पाच कामगार गेले होते. सफाईचे काम सुरू असताना यशवंत शेळके हे सर्वप्रथम खड्ड्यात उतरले. मात्र, बराच वेळ होऊनही ते वर न आल्याने आणि आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने वर उभे असलेले इतर कामगार घाबरले.

शेळके यांना पाहण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी तुषार कोष्टी आणि अक्षय बागडे हे दोघेही एकामागून एक खड्ड्यात उतरले. मात्र, शोषखड्ड्यातील विषारी वायूमुळे तिघांचाही श्वास गुदमरला आणि तिघेही आतच अडकून पडले. दुर्दैवाने या तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

पोलिसांची कारवाई

या घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने तिन्ही कामगारांचे मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले असून ते पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या तिघांचा मृत्यू श्वास गुदमरून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कवठेमहांकाळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Duplicate Ration Card : रेशन कार्ड हरवलं किंवा फाटलं? काळजी नको! घरबसल्या मोबाईलवरून काढा दुसरं कार्ड

Easy Hairstyles : रोजच्या पोनीटेलचा कंटाळा आलाय? ऑफिससाठी ट्राय करा ५ मिनिटांत होणाऱ्या ५ हेअरस्टाईल

ACB Action: जिल्हा परिषदेच्या २ बड्या अधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: धुळ्यात शेतकऱ्याचे कापूस विक्रीचे पैसे लुटल्याप्रकरणी दोघांना अटक

Bigg Boss 20: गुल्लूने कनिका मानसाठी सोडली कॅप्टन्सी; मित्राचा निर्णय पाहून वॉशरूममध्ये रडू लागली अभिनेत्री

SCROLL FOR NEXT