3 Vehicles Accident On Solapur- Pune Highway Saam Tv
महाराष्ट्र

Solapur Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर विचित्र अपघात, कंटेनरची बस आणि दुचाकीला धडक; तिघांचा जागीच मृत्यू

3 Vehicles Accident On Solapur- Pune Highway: सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात सोलापूर- पुणे महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू तर १५ जण जखमी झाले आहेत.

Priya More

विश्वभूषण लिमये, सोलापूर

सोलापूरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले आहेत. सोलापूर- पुणे महामार्गावर हा अपघात झाला. भरधाव कंटेनरने मिनी बस आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की तिन्ही वाहनांचे मोठं नुकसान झाले आहे. सोलापूर पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू आहे. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात तीन वाहनांचा अपघात झाला. या अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू तर १५ जण जखमी झाले. मोहोळ तालुक्यातील कोळेवाडीजवळील सोलापूर- पुणे महामार्गावर कंटेनर मिनीबस आणि दुचाकीमध्ये हा भीषण अपघात झाला. सोलापूर -पुणे महामार्गावर आधी कंटेनर आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातानंतर ट्रकने राँग साईडला जाऊन मिनी बसला जोरदार धडक दिली. ट्रकने मिनी बसला धडक दिल्यामुळे मिनी बस महामार्गावर पलटी झाली.

पंढरपूर-तुळजापूर देवदर्शनाला जाणारे भाविक या मिनी बसमधून प्रवास करत होते. अपघातामध्ये बस चालकासह तिघेजण जागीच ठार झाले. तर १५ जण जखमी झाले. दुचाकीस्वार दयानंद भोसले, मिनी बस चालक लक्ष्मण पवार यांच्यासह एक जण जागीच ठार झाला. कंटेनर मिनी बस आणि दुचाकीचा अपघात झाल्यानंतर महामार्गावर वाहतूक खोळंबली होती. क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेली मिनीबस बाजूला करण्यात आली. याप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुरावर लहान मुलांच्या शाळेच्या बसमध्ये बिघाड

SCROLL FOR NEXT