samruddhi mahamarg  Saam tv
महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची ट्रकला धडक, कल्याणमधील दोघांचा जागीच मृत्यू

samruddhi mahamarg accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव कारने ट्रकला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला.

Vishal Gangurde

समृद्धी महामार्गावर सिन्नरजवळ भीषण अपघाताची घटना घडली

टायर फुटून कार उलटल्यानंतर ट्रकला दिली जोरदार धडक

अपघातात कल्याणमधील दोघांचा जागीच मृत्यू

या प्रकरणी सिन्नर पोलीस घटनेचा पुढील तपास करताहेत

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. वाशिम जिल्ह्यानंतर आता नाशिकच्या सिन्नरमध्ये भीषण अपघाताची दुर्घटना घडली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघात प्रकरणी सिन्नर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सिन्नरला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडलाय. टायर फुटल्यामुळे कार महामार्गावर उलटून ट्रकला धडकली. या अपघातात दोघेजण दगावले. तर अपघातात एकूण नऊ जण जखमी झाले.या कारमध्ये तीन प्रौढ आणि आठ लहान मुले असे एकूण 11 जण या गाडीतून प्रवास करत होते.

अपघातात प्रौढांमधील एक पुरुष तर एक महिला यामध्ये दगावले आहेत. सिन्नर तालुक्यातील फर्दापूर येथे विवाह सोहळ्यानिमित्त आलेल्या कल्याण येथील नातेवाईकांवर ही दुर्दैवी वेळ ओढवली आहे. सिन्नर तालुक्यातील पाटोळे शिवारात येणाऱ्या समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात घडला. यात गाडी पूर्णतः चक्काचूर झाली आहे. घटनेचा अधिक तपास सिन्नर पोलीस करत आहेत.

वाशिममध्ये अपघाताचा थरार

यवतमाळमधून देवदर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा गुरुवारी भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. ही अपघाताची घटना गुरुवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील धनज पोलिस स्टेशन हद्दीत घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT