Buldhana News x
महाराष्ट्र

Accident : देवदर्शनाहून परतताना घात झाला! पाय घसरला अन् मायलेक नदीच्या पाण्यात बुडाले

Buldhana News : बुलढाण्यामध्ये विश्वगंगा नदीत बुडून मायलेकीचा मृत्यू झाल्याची दुख:द घटना समोर आली आहे. या दोघी नांदुरा तालुक्यातील निंबादेवी देवस्थान येथे गेल्या होत्या. देवदर्शनानंतर ही दुर्घटना घडली.

Yash Shirke

संजय जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

बुलढाणा जिल्ह्यात भीषण दुर्घटना घडली आहे. बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यात विश्वगंगा नदीत बुडून दोघांची मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. देवदर्शनाच्या निमित्ताने मायलेकी निंबादेवी देवस्थान येथे गेल्या होत्या. तेव्हा नदीत पाय घसरुन पडल्यांने दोघांची दुर्दैवी अंत झाल्याचे म्हटले जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील मायलेकी देवदर्शनासाठी नांदुरा तालुक्यातील निंबादेवी देवस्थान येथे गेल्या होत्या. देवदर्शनानंतर त्या नदीजवळ गेल्या होत्या. तेव्हा पाय घसरुन दोघी नदीत वाहून गेल्या. नदीत बुडून दोघींचाही मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. दोघींचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. मलकापूर ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

पुण्याच्या मावळमध्ये दुर्घटना

पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे भीषण अपघात घडला. इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेला लोखंडी पूल अचानक कोसळला. त्या वेळेस अनेकजण पूलावर होते. यातील २० ते २५ नागरिक नदीत वाहून गेल्याचे म्हटले जात आहे. या दुर्घटनेमध्ये ६ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. मृताचा आकडा वाढू शकतो असे म्हटले जात आहे.

लोखंडी पूल कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ बचाव कार्य सुरू केले. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणाही काही वेळातच घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक रहिवासी आणि आपत्कालीन पथक मिळून नदीत वाहून गेलेल्या नागरिकांचा शोध घेत आहेत. या दुर्घटनेमागे पुलावर अचानक वाढलेला ताण हे प्रमुख कारण असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT