sayajiraje water park akluj accident Saam tv
महाराष्ट्र

Shocking : माजी उपमुख्यमंत्र्यांच्या भावाच्या मालकीच्या वॉटर पार्कमध्ये मोठा अपघात; पाळणा तुटल्याने पर्यटकाचा मृत्यू, झोका खेळताना आयुष्य संपलं

sayajiraje water park akluj accident : माजी उपमुख्यमंत्र्यांच्या भावाच्या मालकीच्या वॉटर पार्कमध्ये मोठा अपघात झालाय. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

भरत नागणे

पंढरपूर : सोलापूरच्या अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या पार्कमधील पाळा तुटून पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. अकलूज पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पर्यटक माळशिरस तालुक्यातील होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या अकलूजमधील सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये अपघात झाल्याची घटना घडली. सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये भीषण अपघात झाला. पार्कमधील पाळणा तुटल्याने खाली पडून एक पर्यटकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. दोन्ही पर्यटक माळशिरस तालुक्यातील असल्याची माहिती मिळत आहे. घटनेनंतर अकलूज पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

नेमकं काय घडलं?

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधु जयसिंह मोहिते पाटील यांच्या मालकीच्या वॉटरपार्कमध्ये अपघात झाला आहे. अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमधील फिरत्या पाळण्यामध्ये हा अपघात झाला. वेगात पाळणा फिरत असताना एक पाळणा निसटून पडल्याने चार जण जखमी झाले. त्यातील भिगवण येथील तुषार धुमाळ नावाच्या व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघे किरकोळ जखमी आहेत.

अपघात घडल्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघाताची घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटना नेमकी कशी घडली, याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. यासाठी पोलिसांनी वॉटरपार्कमधील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु केली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा अपघात झाल्यानंतर पाळणा तातडीने थांबवण्यात आला आहे. अपघातामुळे पाळण्याच्या शेजारी असलेल्या लोक घाबरले. त्यांनी तातडीने जखमींकडे धाव घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! बड्या नेत्याने सोडली पक्षाची साथ, भाजपच्या वाटेवर जाण्याच्या चर्चा

Maharashtra Live News Update : यवतमाळमध्ये शिंदेसेनेचे हजारो कार्यकर्ते भाजपात

Palghar Tourism : ना मरीन ड्राईव्ह, ना जुहू चौपाटी; वीकेंडला करा 'या' समुद्रकिनाऱ्याची सफर

Baloch Army attack Pakistan: पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला; 50 जवानांचा मृत्यू

MHADA Lottery: ठाणे, पालघरमध्ये म्हाडाची ५२८५ घरे; बदलापूर, सिंधुदुर्गात ७७ भूखंडांसाठी लॉटरी|VIDEO

SCROLL FOR NEXT