solapur news  Saam tv
महाराष्ट्र

Solapur Accident : देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; सोलापुरात भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू

solapur accident news : देवदर्शनाला जाणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. सोलापुरात भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

विश्वभूषण लिमये

तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यात अपघाताची घटना ताजी असताना सोलापूरातही भीषण अपघात झाला. ट्रक आणि कारच्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापुरात रविवारी रात्री बार्शी - लातूर महामार्गावर भीषण अपघात झाला. पांगरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अपघाताने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

बार्शी - लातूर महामार्गावर जांबळबेट पुलावर मालट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारचा चुराडा झाला. या अपघातामधून नवविवाहित दाम्पत्याला तुळजापूरला देवदर्शनासाठी जाताना भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात नवरा-नवरीचा जीव वाचला.

कारमधील ७ पैकी ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. सर्व मृत रहिवासी हे सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी गावाचे नागरिक आहेत. या अपघातानंतर जखमीना तात्काळ बार्शीच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. या संदर्भात पांगरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

अपघाताची माहिती पोलीस घटनास्थळी पोहोचले.त्यांनी रस्त्यावरील वाहतूक कोंडी हटवली. तर अपघातात मरण पावलेल्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांचे मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. तर जखमींनाही तातडीने रुग्णालयात दाखल करत उपचार सुरु करण्यात आले आहेत. अपघातानंतर रस्त्यावर बघ्यांची एकच गर्दी झाली होती. या भीषण अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे 88 व्या वर्षी निधन

Heart health new year resolutions: नव्या वर्षात हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवायचंय? हे ५ संकल्प नक्की करा

पार्टी ऑल नाईट! पुणेकरांचा 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू राहणार, वाचा

Virat Kohli : विराट कोहलीचा नवा विक्रम; सचिन तेंडुलकरच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री

Namo Bharat Express: नमो भारत ट्रेनमध्ये ठेवले शरीरसंबंध, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याची गेली नोकरी

SCROLL FOR NEXT