Traffic on Samruddhi mahamarg will be closed for 5 days What is the reason Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील वाहतूक ५ दिवसांसाठी बंद राहणार; काय आहे कारण?

Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. समृद्धी महामार्गावरील वाहतूक ५ दिवसांसाठी बंद राहणार आहे.

डॉ. माधव सावरगावे

Samruddhi Mahamarg Latest News

समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. समृद्धी महामार्गावरील वाहतूक ५ दिवसांसाठी बंद राहणार आहे. जालना इंटरचेंज ते सावंगी मार्गातील टॉवरचे काम सुरू असल्याने १० ते १२ ऑक्टोबर आणि २५-२६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते ३.३० या वेळेत महामार्ग वाहतूकीसाठी बंद असेल. (Latest Marathi News)

या वेळेत समृद्धी महामार्गावरून (Samruddhi Mahamarg) कोणतीही वाहतूक होणार नसल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी दिली. महामंडळाने या बदलाचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिस प्रशासनाला दिले आहे.

दरम्यान, समृद्धी महामार्गावरुन नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला आहे. वाहनचालक जालना इंटरचेंज-निधोना एमआयडीसी जालना महामार्गावरून छत्रपती संभाजीनगर केंब्रिज शाळा उजवीकडे वळून सावंगी बायपास सावंगी इंटरचेंजहून शिर्डीच्या दिशेने जाऊ शकतात.

त्याचबरोबर शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक सावंगी इंटरचेंज- जालना महामार्गावरून विरुद्ध - दिशेने निधोना जालना समृद्धी महामार्गावर प्रवेश करून नागपूरकडे वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Liver disease: एड्सपेक्षाही धोकादायक आहे 'हा'लिव्हरचा आजार; 'साइलेंट किलर' समस्येची लक्षणंही वेळीच जाणून घ्या

Fraud Case : पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत ३०० कोटींची फसवणूक; शेकडो गुंतवणूकदार अडचणीत

Ankita Lokhande : नाकात नथ अन् कानात बुगडी; अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज, पाहा PHOTO

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT