Mumbai-Goa National Highway Saam TV
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway News: मुंबई-गोवा हायवेवरील वाहतूक उद्यापासून दिवसा बंद राहणार; चेक करा टाईमटेबल

Mumbai Goa Highway News: 27 एप्रिलपासून 3 एप्रिल पर्यंत परशुराम घाटातील दिवसाची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

जितेश कोळी

Ratnagiri News : मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. उद्यापासून म्हणजेच दिनांक 27 एप्रिलपासून 3 एप्रिल पर्यंत परशुराम घाटातील दिवसाची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने जाहीर घेतला आहे.

दुपारी 12 ते संध्याकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान घाटातील वाहतूक पूर्णतः बंद ठेवली जाणार आहे. महामार्गांवरील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लहान वाहनांसाठी पिरलोटे-चिरणी-आंबडस हा पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे. (Latest News)

अवजड वाहनांच्या पर्यायी मार्गाची मात्र कोणतीच व्यवस्था करण्यात आलेली नाही. परशुराम घाटातील काम हे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी दिवसा या मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्याची परवानगी ठेकेदार कंपनीने जिल्हा प्रशासनाकडे मागितली होती.

पर्यायी मार्गाची चाचपणी केल्यानंतर आज संध्याकाळी परशुराम घाटातील वाहतूक बंद करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे उद्यापासून मुंबई-गोवा महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनांना वळसा मारून प्रवास करावा लागणार आहे. तर अवजड वाहनांना मात्र संध्याकाळ होईपर्यंत ताटकळत थांबावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! भाजप नेत्याच्या पुतण्याची चाकू भोसकून हत्या; क्षुल्लक कारणावरून संपवलं, कारण काय?

Soft Chapati Tips: मऊ अन् फुलणारी चपाती बनवण्याचे सोपे घरगुती उपाय

Maharashtra Live News Update: मनमाड शहरात विजांच्या गड गडाटासह जोरदार पावसाची हजेरी

Sarfaraz Khan: 'खान' आडनावामुळे खेळाडूला डच्चू; सरफराजच्या सिलेक्शनवरून वाद पेटला, औवेसीनंतर काँग्रेस नेत्याचे गौतमवर 'गंभीर' आरोप

Bhau Beej 2025: भाऊबीज करताना आरतीच्या ताटात ठेवा या वस्तू, संपूर्ण लिस्ट वाचा

SCROLL FOR NEXT