Pune Bangalore National Highway, Satara, Khambatki Ghat saam tv
महाराष्ट्र

Khambatki Ghat Accident : काेल्हापूरकरांनाे ! पुण्याला निघालात? जाणून घ्या पुणे-बंगळुरू महामार्गाची Traffic Update

Pune Bangalore National Highway : तब्बल साडे तीन तासानंतर वाहतुक सुरळीत झाली.

ओंकार कदम

Khambatki Ghat News : पुणे-बंगळुरू महामार्गावरील सातारा पुणे मार्गावर खंबाटकी घाटाजवळ असणाऱ्या बोगद्यात ट्रकवर विद्युत खांबाचा अँगल पडल्याने अपघात झाला हाेता. परिणामी आज (बुधवार) सकाळपासून बोगद्यातून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली हाेती. तब्बल साडे तीन तासानंतर प्रशासनाने पुन्हा एकदा बोगद्यातून वाहतुक सुरु केली आहे. यामुळे वाहनधारकांचा ट्रॅफिकपासून दिलासा मिळाला आहे. (Breaking Marathi News)

सातारा पुणे मार्गावर खंबाटकी घाटाजवळ असणाऱ्या बोगद्यात चालत्या ट्रक वर लाईटचा अँगल पडला. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. या अपघातामुळे बोगद्यातून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद करून ती जुन्या रस्त्याने म्हणजेच खंबाटकी घाटातून पुण्याकडे वळवली हाेती.

यामुळे पुण्याहून येणारी वाहनं आणि साता-याकडून पुण्याला जाणारी वाहनं यांची घाटात गर्दी झाली. परिणामी एकेरी वाहतुक दुहेरी झाल्याने वाहनधारकांना इच्छित स्थळी पाेहचण्यास विलंब लागला. तब्बल साडे तीन तासानंतर बोगद्यातील अपघातग्रस्त टेम्पो बाजूला काढल्यानंतर. पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक नव्या खंबाटकी बोगद्यातून सुरळीत सुरू झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oli Bhel Recipe: चौपाटीवर मिळणारी चटपटीत ओली भेळ, वाचा सीक्रेट रेसिपी

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT