Mumbai - Goa Highway News, Rain saam tv
महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway Traffic Updates : मुंबई गोवा महामार्गावर एकेरी वाहतुक सुरु; हातखंबा ते निवळी रस्ता खचला

पावसाचा फटका रत्नागिरी - गणपतीपुळे मार्गाला देखील बसला हाेता.

अमोल कलये

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची बॅटिंग सुरुच आहे. येथे सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. दरम्यान पहिल्याच पावसाचा मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याला देखील माेठा फटका बसला आहे. बहुतांश ठिकाणी छाेटे माेठे खड्डे पडले आहेत. यामुळे महामार्गावरुन प्रवास करणा-यांचे हाल हाेताहेत. (Maharashtra News)

सतत पडणा-या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील (mumbai goa highway) रस्ता खचला आहे. ही घटना हातखंबा ते निवळी दरम्यान घडली आहे. रस्ता खचल्याने वाहनधारकांना मार्गक्रमण करण्यात अडचणी येताहेत. यामुळे मुंबई गोवा महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरु आहे.

मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे. या भागात पावसाचा जाेर वाढला आहे. ज्या भागात रस्ता खचला आहे तेथे कालपासून ठेकेदारानं दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान आज (गुरुवार) जेसीबीच्या साह्याने खचलेला भागाची डागडूजी सुरु आहे. परंतु पावसाचा अडथळा येतच आहे.

दरम्यान पावसाचा फटका रत्नागिरी - गणपतीपुळे मार्गाला देखील बसला हाेता. भंडारपुळेत पावसाचं पाणी रस्त्यावर आले हाेते. त्यामुळे दोन्हीकडची वाहतूक ठप्प झाली हाेती. रत्नागिरी जिल्ह्यात चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला हाेता. अनेक भागात दमदार पाऊस पडला. तसेच दक्षिण रत्नागिरी आणि उत्तर रत्नागिरीत पाऊसधारा सुरु हाेत्या.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OYO Hotel: कपल्सची होणार गोची? तासांवर रूम मिळणं होणार कठिण? VIDEO

Nagpur Tourism : नागपूरमधील विरंगुळ्याचे ठिकाण, 'येथे' घ्या क्षणभर विश्रांती

Maharashtra Live News Update : यंदाच्या हंगामात पांझरा नदी पहिल्यांदाच वाहू लागली दुथडी भरून

Shocking: 'ती'ओरडत राहिली पण..१० वर्षीय चिमुकलीचे नराधम पित्याने लचके तोडले, आईला कळताच..

Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? आत्ताच हा यशाचा मंत्र लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT