karad, satara, malkapur
karad, satara, malkapur saam tv
महाराष्ट्र

Pune Bangalore National Highway : कराड - मलकापूर उड्डाणपूल पाडणार; जाणून घ्या वाहतुक मार्गातील बदल

Siddharth Latkar

Karad : साताराहून (satara) काेल्हापूरकडे (kolhapur) जाताना असलेला मलकापूर (malkapur) येथील उड्डाणपुल (bridge) आगामी काळात पाडण्यात येणार आहे. हे काम 25 मार्च 2023 पर्यंत चालणार आहे. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता म्हणून रविवारपासून (ता. पाच फेब्रुवारी) कराड (karad) व मलकापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे.

पाेलीस अधीक्षक समीर शेख यांनी वाहतुक मार्गातील बदलाबाबतचा काढलेला आदेश असा

1) काेल्हापूरकडून सातारा बाजूकडे जाणारी वाहतुक ढेबेवाडी फाट्यावरील आेव्हरब्रिज कराड बाजूस ज्या ठिकाणी संपताे तेथे पश्चिमेकडील सेवा रस्त्यावर वळविण्यात येणार आहे.

2) काेल्हापूरहून कराडला येणारी वाहने ही एकेरी वाहतुकीने वारुंजी फाटा पर्यंत येतील. तेथून पुढे

अ) जड वाहतुक ही वारुंजी फाटा येथून हाॅटेल पंकज समाेरुन सेवा रस्ता मार्गे महात्मा गांधी पुतळ्यासमाेरुन कराड येथे जाईल.

ब) हलकी वाहतुक ही वारुजी पाटा येथून जूना काेयना ब्रिज (old koyna bridge) मार्गे कराडमध्ये जाईल.

3) कराड शहरामधून काेल्हापूर नाका येथे बाहेर पडणा-या वाहनांसाठी

अ) काेल्हापूर बाजुकडे जाण्यासाठी सेवा रस्ता मार्गाचा वापर करुन जाता येईल.

ब) कराडमधून साताराकडे जाणारी वाहने भादी हार्डवेअर समाेरुन उजवीकडे यु-टर्न घेवून नंतर इंडियन Oil पेट्राेलपंपाजवळ सेवा रस्त्याला मिळणार आहेत.

4) सातारा ते काेल्हापूरकडे जाणारी वाहतुक हाॅटेल पंकज समाेरुन पश्चिमेकडील काेल्हापूर लेनवर वळविण्यात येईल. कृष्णा हाॅस्पिटल समाेरील ब्रिजसंपले नंतर गंधर्व हाॅटेलजवळ वाहतुक पुर्ववत महामार्गावर घेण्यात येईल.

5) साताराकडून काेल्हापूरकडे (वारुंजी फाटा ते गंधव हाॅटेल) व काेल्हापूरकडून साताराकडे (काेयना वसाहत ते वारुंजी फाटा) जाणारी वाहतुक ही एकेरी वाहतुक असल्याने विरुद्ध दिशेने वाहने चालविण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच या मार्गावर काेणतेही प्रकारची वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे.

6) कराड बाजूकडून ढेबेवाडीकडे जाणारी वाहतुक ही काेल्हापूर नाका ते ढेबेवाडी फाटा पर्यंत एकेरी मार्गाने ढेबेवाडी फाटापर्यंत जावून ब्रिज खालून ढेबेवाडीकडे जाईल.

7) ढेबेवाडी बाजूकडून कराड शहराकडे येणारी वाहतुक ही ढेबेवाडी फाटा येथून पश्चिमेकडील संवा रस्त्याने वारुंजी फाटा मार्गे कराडमध्ये येईल.

8) जड वाहतुक (ODC वाहने) ही फक्त रात्रीच्या वेळी वाहतुकीस परवानगी देण्याचे नियाेजन करण्यात आले आहे.

9) काेल्हापूर नाका (kolhapur Naka) ते पंकज हाॅटेल (hotel pankaj) या मार्गावर असणार भुयारी मार्ग बंद राहील. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

Beet juice : या लोकांनी चुकूनही पिऊ नये बीटचा ज्यूस

SCROLL FOR NEXT