महाराष्ट्र

Akola News: भयावह परिस्थिती! कांद्याच्या उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर, दानापूर हिंगणी गावात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान

Onion Farmers: अकोल्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवीन संकट निर्माण झाले आहे. चार महिने उलटले तरी कांदा पिकाची वाढ होऊ शकली नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तणावाचा सामना करावा लागतो आहे.

Dhanshri Shintre

अक्षय गवळी/साम टीव्ही न्यूज

अकोल्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट उभं ठाकलं आहे. चार महिने उलटले, तरीही कांदा पिकाची वाढ होईना. यामुळे तेल्हारा तालुक्यातला कांदा उत्पादक शेतकरी मोठा चिंतेत आला आहे. याच नैराश्यामधून अनेक शेतकऱ्यांनी कठोर भूमिका घेतली अन थेट कांद्याच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे.

सध्या शेतकऱ्यांसाठी कांदा लागवडीचा खर्च निघणे कठीण झाले आहे. चार महिने उलटले तरी कांदा तयार होण्यास वेळ लागतो आहे. काही शेतकऱ्यांच्या कांद्याला पालवेही फुटलेले नाही, तर काहींचे कांदा पिक पूर्णपणे जळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय.

मात्र एवढ्या कष्टाने पिकवलेल्या पिकाला चार महिने उलटले, तरीही कांदा पिक तयार होईल, याच आशेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता अक्षरशः पाणी आलं आहे. अखेर शेतकऱ्यांचा संयमचा बांध फुटला अन् कठोर भूमिका घेतली. आज तेल्हारा तालुक्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांचे कांद्याचे पीक धोक्यात आहे. वातावरणाच्या लहरीपणामुळे कांदा पिकांची वाढ थांबली असल्याचे बोलले जात आहे.

नोव्हेंबर महिन्यात कांदा पिकाची लागवड झाली, पिकात वाढ होत नसल्यानं शेतकऱ्यांनी कांदा पिकावर अनेकदा औषधे फवारणी केल्या. परंतु, फरक जाणवलाच नाही. दानापूर आणि हिंगणी गावात कांदा पिकाच १०० टक्के नुकसान झाले आहे. याच नैराश्यामधून इथला शेतकरी कांदा पिक शेतातून उखडून फेकलं आहे, तर काही जण उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT