A distressed farmer in Beed stands helpless in his flooded cotton field after torrential rains washed away his entire crop Saam Tv
महाराष्ट्र

Farmers in Marathwada: आभाळाचं क्रूर रूप! अतिवृष्टीने पिकं आणि आशा दोन्ही वाहून घेतली,बळीराज्याने फोडला टाहो

Heavy Rains Destroy Standing Cotton: अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेला बळीराजा सैरभैर झालाय... उभं पीक पाण्यात गेल्यानं बळीराजा टाहो फोडतोय.. आभाळातून पडलेल्या पावसामुळे आता त्याच्या डोळ्याला धारा लागल्यात.. त्यामुळे कोलमडून पडलेल्या याच बळीराजाचा आक्रोश पाहूयात शेतकऱ्याच्या बांधावरुन

Bharat Mohalkar

हा आहे अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाचा आक्रोश.... अतिवृष्टीनं फक्त कपाशीच उद्ध्वस्त झाली नाही तर शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखलही झालाय...याच चिखलाने माखलेल्या, अतिवृष्टीने खचलेल्या बळीराजाचा हा उद्वेग...

हिरापूरच्या राजेंद्र ओडमारेंचा कित्येक एकरावरचा ऊस पुराच्या पाण्यात वाहून गेलंय.. . आता आम्ही जगायचं कसं? असा सवाल ओलावलेल्या डोळ्यांनी राजेंद्र ओडमारे करतायत...फक्त कापूस आणि ऊसच नाही तर तरारुन आलेल्या तुरीतही अतिवृष्टीमुळे गुडघ्याइतकं पाणी साचलंय.. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या घासाची माती झालीय...

अतिवृष्टीने फक्त मराठवाडा आणि अहिल्यानगरमधील शेतकरीच उद्ध्वस्त झाला नाही.. तर सोलापूर जिल्ह्यातही भीषण परिस्थिती निर्माण झालीय.. सीनेनं सगळा संसारच गिळल्याने हतबल झालेल्या माढा तालुक्यातील सावंत कुटुंबियांनी तीन दिवसांपासून अन्नाला हात लावला नाहीये...

तर लेकरासारखी जपलेल्या जनावरांनी डोळ्यापुढं जीव सोडल्याचं पाहून शेतकऱ्यांवर आभाळ कोसळलंय..खरंतर लवकर पाऊस झाला.. त्यामुळं पेरणीही लवकर झाली.. आणि आता पीक तरारुन आलं.. त्यामुळं डोक्यावरचं दहा लाखांचं कर्ज फिटेल, अशी आशा निर्माण झाली होती.. मात्र आता सगळं काही संपल्याची हतबलता हरिराम मुंताळ या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसतेय...

अतिवृष्टीमुळे बळीराजा हतबल झालाय.. सगळं काही हातातून निसटून गेल्यानं तो हतबल झालाय.. त्यामुळे कोलमडून पडलेल्या बळीराजाला धीर देण्यासाठी सरकार मदत देईलच.. पण आपल्या ताटातल्या भाकरीला जागून आपणही मोडून पडलेल्या बळीराजाला आधार देण्यासाठी मदतीचा हात पुढं करणं गरजेचं आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Box Office Collection : 'थामा' की 'एक दीवाने की दीवानियत' वीकेंडला कोणता चित्रपट हाऊसफुल? वाचा कलेक्शन

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

'Naagin 7'मध्ये कोण बनणार इच्छाधारी नागिन? सोशल मीडियावर 'या' नावाची चर्चा

Shocking : नागपूर हादरलं! १२ वर्षांच्या मुलीला लॉजवर नेलं, नराधमांनी बलात्कार करून व्हिडिओ काढले

Maharashtra Crime : तुला पुण्याला सोडतो... सोलापूर महामार्गावर लिफ्टच्या बहाण्याने तरूणीवर बलात्कार, महाराष्ट्र हादरला!

SCROLL FOR NEXT